NiKi

NiKi

Thursday, February 9, 2012


" तुझ्याशिवाय "

ती आयुष्यात आली .......

ती आयुष्यात आली
कसी आली कळलेच नाही ....
का मी तीला स्वतः आणले
मला खरच माहित नाही ...

पण ती आली आयुष्यात
एक थंड हवेची झुळूक बनून ...
विराण झालेले माझे विश्व
बहरले तीचे होऊन ...

ती एक निखळ झरा
मी एक संथ नदी ....
कसे जमले हे धागे
काहीच कळले नाही ...
पण ती आली आयुष्यात
कशी आली खरच कळले नाही ...

No comments:

Post a Comment