NiKi

NiKi

Tuesday, February 14, 2012

त्याला खरंतर म्हणायचं होतं,
"प्रिये, माझं कित्ती प्रेम आहे तुझ्यावर..!"
पण म्हणताना मात्र तो म्हणाला,
"हा काय ड्रेस घातलायस आज!!"
आणि गंमत म्हणजे तरीही तिला
ते न म्हटलेलं वाक्यच ऐकू आलं
कारण परवाच तिनेही नाही का
"ए, तू मला कित्ती रे आवडतोस"चं 'भाषांतर'
"मी मुळी आता बोलणारच नाहीये तुझ्याशी..!!"
असं केलं होतं...!

No comments:

Post a Comment