NiKi

NiKi

Tuesday, February 14, 2012

बघना ग आज पुन्हा व्हयालेनटाईन डे आला
तो लबाड पुन्हा तुला खुलवायला आला.

आजही बघ असच झाल. 
त्याच्या वाट्याच पुरेपूर प्रेम त्याला मिळाल. 
त्याला बघून तू खुदकन हसलीस. 
तुझ्या नाजूक हातांनी त्याला कुरवाळलीस. 
त्याचा स्पर्श तुझ्या मनाला मोहरून  गेला. 
तुझ्या नजरेच्या प्रेमधारेत तो चिंब भिजून गेला.
त्याच्या मंद गंधात तुला, तुझ्या प्रेमाचा श्वास सापडला. 
त्या वादळात हरवता हरवता तुला 
सगळ्याचा विसर पडला. 

तुझ नि त्याच नात असच आहे.
मला वाटत माझ्या पेक्षा तोच लकी आहे. 
वर्षातला हा दिवस त्याचाच असतो, 
मी बिचारा त्याच्या मधेच मला पहातो.
त्याच्या सहवासात तुला कसलंच भान नसत.
तुला बघताना मी एकटाच झुरतोय 
हे तुझ्या गावीही नसत.

मी तरी अस का करतो कळत नाही. 
मनातल्या माझ्या भावना तुला 
सांगून का टाकत नाही? 

आज मात्र मी बोलणार आहे.
मनातल्या या  भावना मोकळ्या करणार आहे. 

सहवास तुझा मला सुद्धा हवा असतो.
प्रेमात तुझ्या मी सुद्धा बुडून मरायला तयार असतो.
माझ्याही प्रत्येक श्वासात तूच तर असतेस. नाही नाही,
माझा तर प्रत्येक श्वासच तू असतेस. 
समोर तुला बघता मात्र मी सगळ विसरतो. 
तुझ्या नजरेच्या जादूत परत मीच हरवतो.

नेहमी हे असच होत.
काही न बोलता माझा मीच झुरतो.

आशा वेळेस मनात माझ्या एकच प्रश्न येतो.
त्याच्या ऐवजी मीच का लाल  गुलाब नसतो.

No comments:

Post a Comment