NiKi

NiKi

Wednesday, February 1, 2012

तुझ्या मिठीत मला यायचे आहे,
अन् या जगाला विसरायचे आहे!

जरी तू माझ्यापासून दूर देशी,
तरी सागरकिनारा माझ्यापाशी!

कारण जेव्हा उभी असते मी सागरकिनारी,
दिसते मला आकाश अन् सागराची ती मिठी!

मग सांग सख्या रे! कधी तू येशी?
अन् अलगद तुझ्या मिठीत मला घेशी?

त्या क्षण्नाचा मोह न आवरे मला,
कारण तू येण्याची चाहुल सतावते आता मला!

त्या चाहुलितुन बघते मी रात्री आकाशी,
अन् भावनांवर माझ्या हसतो चन्द्र आकाशी!

मीही त्याला चिडवायच म्हणते,
पण हि सकाळ मला अडवते!

दाखवेन मीहि आपली मिठी त्याला एक दिवशी,
अन् तोही मग वर्षाव करेल त्याचा प्रितीचा आपल्यावरती!

आज निसर्ग सगला तुझ्यासोबती,
पण तू आहेस माझ्यासंगती!

जरी तू आहेस त्यांच्यासोबती,
तरी मन तुझे आहे माझ्यासंगती!

मग सांग कस त्यांना समजावू,
कारण आपल्या प्रेमात मला विश्वास आहे फ़क्त आपल्यावारती…
कारण आपल्या प्रेमात मला विश्वास आहे फ़क्त आपल्यावारती…

No comments:

Post a Comment