NiKi

NiKi

Tuesday, February 14, 2012

प्रेम आणि प्रेम....

प्रेम जन्मतं आईतून
प्रेम बागडतं मैत्रीतून

प्रेम जडतं जीवलगातून
प्रेम रुजतं साथीतून

प्रेम सजतं नात्यातून
प्रेम उणावतं अपेक्षातून

प्रेम व्यक्त कलेतून
प्रेम झळाळतं त्यागातून

प्रेम बरसतं पावसातून
प्रेम फुलतं निसर्गातून

प्रेम समर्पण भक्तितून
प्रेम दर्शन (अनुभूति) मूर्तितून

प्रेम जगतं माणसातून
माणूस जगतो प्रेमातून

प्रेम असीम अनंत होऊन
प्रेमच एक सर्वां व्यापून

प्रेम व्यक्ताव्यक्तातून
प्रेम चराचरातून

No comments:

Post a Comment