लाडकी मैत्रीण !!!!
तुझ्यासारखी मैत्रीण असावी,
नेहमी मनाला वाटायचं !
आभाळ माझ्या मनीच,
एकटच मनात दाटायंच!
मनातल सार दुःख,
तुला येऊन सांगायचं!
डोक ठेऊन खांद्यावर,
सार विसरून जायचं!
तुझ्यासाठी खूप सार सुख,
देवाकडून मागून घ्यायचं !
तुझ सुख ते माझ मानून,
एकत्रित आनंदून जायचं!
सार काही मिळालं मला,
तुझ्या गोड मैत्रीतून!
देवच जणू गवसला मला,
तुझ्या या रूपातून!
आयुष्यभर आता तुझ्या
हात सोबतीचा असु दे!
जन्मोंजन्मी तुझ्याच मैत्रीची,
आस मला असु दे!
श्वासातला प्रत्येक श्वास,
तुझ्या आनंदासाठी असें!
शेवटच्या श्वासात देखील देवाकडे,
तुझ्याच सुखाच मागण मागेन!
No comments:
Post a Comment