कितीही व्यवहारिक जरी राहिले ,
जीव जडला जातो जिथे,
मन नकळत गुंतते तिथे,
तर्कशास्त्र सगळे फुकट जाते !
ताबा बुद्धीचा मन घेते ,
अगदी पार वेड लागते,
नशा हळूवार चढवणारे असले,
तरी आपोआप प्रेमात पडणे होते !
एकतर्फी झुरण्याला
प्रेम म्हणायचे कसे ?
रुसण्या फुग्ण्याशिवाय
प्रेम फुलायचे कसे ?
भांडलेतरी एकमेकां
शिवाय कर्मायचे कसे ?
काहीतरी करून
मनवल्याशिवाय रहायचे कसे ?
काठावरून नृत्य लाटांचे
पाहण्यात मजा ती कसली ?
प्रेमाची नुसती स्वप्ने
पहाण्यात मजा ती कसली ?
नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय
पोहणार ते कसे ?
जादू प्रेमाची अनुभवल्याशिवाय
प्रेम कळणार कसे...?
No comments:
Post a Comment