NiKi

NiKi

Monday, March 25, 2013

कोणा कळले नाही.....

साठलेले दुख: मनीचे,
बांधहि फुटले आसवांचे
आज मनीचे मेघ बरसले,
कोणा कळले नाही.....

डोळ्यांमधला हा ओलावा,
कसा सांग ना मी झेलावा?
पावसात त्या मी हि भिजले,
कोणा कळले नाही....

काळजातल्या त्या जखमांवर
तू च घातली हळूच फुंकर
नकळत मी का गाली हसले,
कोणा कळले नाही......

No comments:

Post a Comment