सोबत असताना...
चंद्राच देखणेपणही फिकं वाटत,
चांदण्यांनी नटलेलं
रात्रीचं आभाळही रितं वाटत,
तू सोबत असताना...♥♥♥
पावसातल्या गारा
अन अंगावरचा तो
ओलसर शहारा
हवाहवासा वाटतो,
तू असताना
पावसाची प्रत्येक सर
अन सरीचा प्रत्येक थेंब
तुझ्या गालांवर निजवावासा वाटतो,
तू सोबत असताना...♥♥♥
तुला पाहताक्षणी
सुचलेली पहिली ओळ
तू जाताना मात्र
तो माझ्या कवितेचा शेवट वाटतो,
शब्दागणिक वाढणारी अगतिकता
अन प्रत्येक ओळीमागे तुझे नाव
असा शब्दांचा खेळ मांडावासा वाटतो,
तू सोबत असताना...♥♥♥
हातांमधला तुझ्या स्पर्शाचा भास
अन त्या स्पर्शातली तू
वाटा असतील भलेही वेगळ्या
पण प्रत्येक वाटेच्या शेवटी असशील तू,
तुला सांगायचय एकदा
किती हसरे होतात क्षण सारे माझे....
तू सोबत असताना...♥♥♥
तू सोबत असताना...♥♥♥
♥♥♥ NIKI♥♥♥

No comments:
Post a Comment