NiKi

NiKi

Friday, March 22, 2013



झोपताच राहते डोळ्यात माझ्या
का अशीच लाजते स्वप्नात माझ्या

गीत हे अनोळखी गाता न आले
स्वर साज साठले कंठात माझ्या

वेग का मंदावला श्वासातला तो
ती अशीच चालते हृदयात माझ्या

मी नशेत छेडतो त्या आठवांना
ती अशीच पाजते कैफात माझ्या

ये कुमार सांग माझ्या सोनियाला
रोज वाट पाहते रस्त्यात माझ्या

No comments:

Post a Comment