NiKi

NiKi

Thursday, March 21, 2013

तू रुसलीस कि माझ्यावर चंद्र हि रुसतो...
आभाळात दूर कुठे तरी लपून तो बसतो...
माझ्याशी बोलायला मग नसतच कोणी...
तू हि दूर असतेस,
अन माझ्याच नकळत,
माझ्या डोळ्यात साचत पाणी...

तू रुसलीस कि माझ्याशी चांदणी हि बोलत नाही...
मी फक्त पाहतच बसतो तिला,
पण ती...
ती काही माझ्या कडे पाहतच नाही...
का, अस ती हि वागते माझ्याशी..
ते काही मला कळतच नाही...
अन तुझा तो दुरावा,
तो दुरावा हि मला सोसवत नाही....
रुसवा तो तुझा मी कसा घालवू,
ते ही मला उमगत नाही...
ते ही मला....
.... उमगतच नाही....

No comments:

Post a Comment