NiKi

NiKi

Thursday, March 21, 2013

ती समोर असताना …मी सारं काही विसरावं.. तिने इश्य करत लाजावं.. मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं.. तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं.. कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं.. तिने कित्ती गोड बोलावं.. ऐकणा
ऱ्याने विरघळून जावं.. हरवूनच जावं .. सोबत तिच्या.. तिने कित्ती साधं रहावं .. त्यातही रूप तिचं खुलावं.. कोणीही फिदा व्हाव .. अदांवरतिच्या.. तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं.. ...कोणालाही वाईट वाटावं.. अश्रूंनी तिच्या.. तिचं हसणं .. कोणालाही सुखवावं.. कोणीही घसरून पडावं.. गालावरल्या खळीत तिच्या.. तिच्या नजरेने मलाच शोधावं..अचानक नजरेने नजरेला भिडावं .. मग तिने लगेच दुसरीकडे पहावं.. लाजेने चूर चूर व्हावं.. तिने फक्त माझंच रहावं.. मीही फक्त तिच्यासाठीच जगावं.. साथ देऊ जन्मोजन्मी..विर हाचं दुख कधीही न यावं.. कधीही न अनुभवावं...!!!! !!

No comments:

Post a Comment