NiKi

NiKi

Saturday, December 3, 2011

|| निशब्द भावना ||

          
निशब्द भावना हि अर्थास जन्म देते |
प्रीतीच्या चाहुलीने मन ओसंडून येते |

भेटीच्या ओढीमध्ये क्षण हळुवार सरू लागतात |
काळजाचे ठोके अपोआपच वाढू लागतात |

आतुरतेने वाट पाहून तो क्षण सत्त्यात उतरतो |
हलकाच हाथ तुझा माझ्या हातामध्ये येतो |

स्पर्श तुझा मानस माझ्या गुदगुल्या करून जातो |
डोळ्यांमध्ये जसा मी तुझ्या नकळत हरून जातो |

वर्णनात तुझ्या काही मन माझे पूटपुटते |
कल्पना माझी जशी एका च्याचित्रामध्ये उतरते |

माऊ गुलाबी ओठ तुझे जसे मधुरसाचे प्याले |
मंजुळ तुझ्या आवाजने माझे देहभान हरपुनी नेले |

निशब्द भावनेला जसे पंख फुटून गेले |
सरता ते क्षण शरीरावर रोमांच सोडूनी गेले........!!!!!!

No comments:

Post a Comment