NiKi

NiKi

Tuesday, December 13, 2011

माझं स्वप्न आहे, ..............................

माझं स्वप्न आहे, तुझ्यासोबत जगण्याचं,
हातात हात घेऊन, एकाच दिशेन चालण्याचं,

माझं स्वप्न आहे, तुला जवळून पाहण्याचं,
जवळ तुला घेऊन, एकदा मिठीत घेण्याचं,

माझं स्वप्न आहे, तुझ्यासोबत राहण्याचं,
छोठसं घरट बांधून, त्यात दोघांनीच राहण्याचं,

माझं स्वप्न आहे, तू स्वप्न बघण्याचं,
आणि दोघांनी मिळून, ती पूर्ण करण्याचं,

माझं स्वप्न आहे, मी चित्र रेखाटण्याचं,
त्यात रंग भरून, ते तू रंगवण्याचं,

माझं स्वप्न आहे, तुझ्यावर रुसण्याचं,
रुसलो मी म्हणून तू प्रेमाने म्हणवण्याचं,

माझं स्वप्न आहे, हसन्याचं हसवण्याचं,
एकचं हे जीवन एकून स्वर्गमय करण्याचं,

माझं स्वप्न आहे, तुझ्यासोबत जगण्याचं,
तुझ्यासोबत जगुन, तुझ्या अगोदर मरण्याचं,

पण मनात भीतीसुद्धा आहे, हे स्वप्न तूटण्याचं,
माझं स्वप्न विखरुन सर्वच होत्याचं नव्हतं होण्याचं.

No comments:

Post a Comment