NiKi

NiKi

Monday, December 19, 2011

अक्षर म्हणतात शब्द हवा,
शब्द म्हणतात अर्थ हवा,
माणसाच्या आयुष्याला
यशाचा मात्र स्पर्श हवा.

एकेका फांदीवर बसते,
रोज नवी कोकिळा,
त्या फांदीची मनीषा हीच,
कि रोज तिला नवा पक्षी हवा.

लक्ष तारकांच्या देशी,
एकाच तयांना चंद्र हवा,
अन चंद्रची पहा आकांक्षा,
त्यास नवा आसमंत हवा.

सुरांची मेहफिल खूब साजेल,
त्या साथीला मात्र सितार हवा,
कित्येक जीव येथे आले नि संपले,
जगण्यास त्या आधार हवा.

शब्दांचे सहजच काव्य बनते,
रचणारा एकच कवी हवा,
कवी मनाला प्रेरित करण्या,
भाव प्रीतीचा मनी हवा.
 

No comments:

Post a Comment