NiKi

NiKi

Wednesday, December 21, 2011

स्वप्नांशी बोलणारी तू….
खुप छान वाटतं,
तुला स्वप्नाशी बोलताना पहाणं,
अर्धवट झोपेतली तू
आणि तुला झुलवणार तुझं स्वप्न,
निरागसतेच्या एका नाजुके सारखं…..
कळत कस नाही तुला वेडे
स्वप्नांना प्रकाशाचा शाप असतो..
त्यांना
निळ्या आकाशाचा धाक असतो..
हात नको लावूस… ती विरघळुन जातात
कापराचे बोचरे क्षण… हातात येतात..!!!!
वा-याचा आकार आणि पा-याचं रूप
काय काय बघायचं ग….
तुझी नंतरची तडफ़ड नाही बघवत
हुरहुर लागते मनाला..
पण छान दिसतेस तेव्हाही,
वाहुन गेलेल्या वा-याला पकडताना…..
खरच,
खुप छान वाटतं,
तुला स्वप्नाशी बोलताना पहाणं….
ते बघायलाही नशीब लागतं नाही…?

No comments:

Post a Comment