NiKi

NiKi

Thursday, December 22, 2011

रुक्मिणी होण्यापेक्षा
माझ्या कृष्णाची राधा होणच आवडेल मला
एक आयुष्य सोबत घालवण्यापेक्षा
युगांसाठी तुझी होणच आवडेल मला

राधे सारख आधी माझ नाव
हा ध्यास मुळीच नाही........
पण तुझ्या सोबतीने प्राणसख्या
सदैव रहायच आहे मला

तू फ़क्त माझा व्हावास
असा हट्टाहास नाही करणार मी
पण माझ्यात फ़क्त तूच असशील
इतकच अभय दे मला .....

जग काय म्हणेल
याची चिंता किंचितही नाही
पण तू मात्र अंतर देऊ नकोस
या तुझ्या वेड्या राधेला ......

No comments:

Post a Comment