आजही पुन्हा तशीच गेली,
आजही पुन्हा तशीच गेली,
रात्र अख्खी तळमळती....
आठवणींचा फ़ुलुन पिसारा,
गुदगुल्या पुन्हा अंगावरती.....
मी कुस बदलली बर्याचदा,
अन मिटले डोळे आवळुनी....
पण मुर्त तुझी निर्मळ मज,
उठवत होती का हालवुनी.....
उष्ण उष्ण हवा जरी होती,
रोम रोम तरी पुलकित होता....
शहारलेल्या मनास घेऊन,
बसलो होतो मी हसत स्वतः....
आठवण अशी तर तु कशी,
का मजला दुरुन दिसशी.....
नकोस येऊ जागत्या स्वप्नी,
नेत्रपटलांची ही जादु जशी....
तु फ़ुलराणी कि रातराणी,
घुमते कानात तुझी वाणी....
रात्र कशी तडफ़डते जणु,
चित्र तुझे गं मनीध्यानी....
बोल लाडले बोलते झाली,
दशा करुन ही हळहळती....
आजही पुन्हा तशीच गेली,
रात्र अख्खी तळमळती...
No comments:
Post a Comment