NiKi

NiKi

Thursday, December 22, 2011

निशिगंध पसरला
मुग्ध शरदाचे चांदणे
उतरता अवनीवर
हर्षे सौंदर्याचे लेणे

कशी किमया मग झाली
सोने हळूच पसरले
प्रियकराच्या उबेला
प्रिया मन आसुसले

नाही कसले बहाणे
नाही तसले उखाणे
लज्जा लाजत प्रियेची
कुशीमध्ये विसावणे

थंड वार्याची झुळूक
गात्र गात्र थरारती
तरी प्रिया का रुसली
मग प्रिया का हसली

काय करावे सुचेना
प्रियकर झाला खुळा
शारदाचा येता झोका
झाला आणिक बावळा

मानू आभार कुणाचे
शारदीय चांदण्याचे
थंडगार त्या हवेचे
उबदार कि प्रियेचे

राधा एकरूप झाली
कृष्ण सावळा दिसेना
शरदाच्या चांदण्यात
गौर वर्णही हरवला

पावा कुणासाठी होता
कण कण झंकारता
राधा मनी कृष्ण कृष्ण
कृष्ण मनी राधा राधा

No comments:

Post a Comment