NiKi

NiKi

Saturday, December 10, 2011

नाते तुझे माझे

भेट मनाची या मनाला
श्वास श्वासास मिळाला
स्पंदनांचे गीत व्हावे
दवाने  दवास भिजवावे 


राहिले ते ऋण होते
मिटले  ते समर्पण
अस्मितेच्या स्वत्वाचे
जसे दर्शनार्थी  दर्पण


सावलीही साथ सोडे
अन ते हि तीमिरांती
मात्र समांतर असे  तू
या जन्मी  अन मरणांती


मायेच्या नात्यात
गुरफटलेली सर्व नाती
ना--ते असे हे नाते
उलगडुनी साऱ्या गाठी.

No comments:

Post a Comment