NiKi

NiKi

Wednesday, December 28, 2011

रात्र माझी झरत जावी तुझ्या डोळ्यांत..
झिरपावी तुझ्या मनात,
आणि मग सुंदर सरोवर तयार व्हावं..
मुग्ध करणारं तुला अन् मला...
रात्र सरावी अर्धी तुझ्या डोळ्यांत,
तुझ्या स्वप्नांत,
अन् शांत निशा अनुभवावी दोघांनीही..
आणखी कुणीच नसावं जगात,
त्या धुंद रजनीला चांदण्यांची कड लाभलेली..
ऐकत रहावी स्पंदनं आपल्या हृदयातली,
सगळ्या भावनांचे अर्थ विनाशब्दच कळतील..
रातराणीचा सुगंध तुझ्या श्वासांतला,
मी माझ्या गात्रांत भरुन घेईन..
अन् अमृताचा ओलावा तुझ्या डोळ्यांतला
शोषून घेईन माझ्या कणाकणात..
असं वाटतं,
तुला घेऊन जाता यावं कोणत्यातरी अनाम जगात..
आपलं दोघांच जग..
मी मिळ्वेन शाश्वत आनंद,
बकुळीची फुलं सगळी फुलून यावीत..
त्यांचा गोडवा अन् गुलमोहराचा वणवा,
 नसानसांत पसरावा..
अन् प्रत्येक अणूरेणू उत्तेजित व्हावा,
प्रत्येक क्षण न क्षण...
तुझ्याच्सोबत जगता यावा,
चालत राहावं तुझ्याचसोबत..
क्षितिजापार.....
पाय थकेपर्यंत,
वाट संपल्यावरही...
आयुष्याच्या अंतापर्यंत...
अशी माझी प्रत्येक रात्र,
तुझ्या असण्याने..
तुझ्या अस्तित्त्वाने..
प्रकाशमान होऊ दे....

No comments:

Post a Comment