NiKi

NiKi

Tuesday, December 13, 2011

एक असंही प्रेम होतं........................

दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......

मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

मुलगा   फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो   सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

दुसऱ्या   दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि   ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये   बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे .

थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय
ती   मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती ........ कारण,   रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ   होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि   त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते .... 

No comments:

Post a Comment