आज न जाणे कुठली हवा,चित्त थंडावून गेली,
आगळीच कल्पना जणू, मनी भंडावून गेली;
कसा माझ्यातला मी, सहज भुलवून गेली;
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!
नवे नाते कुठलेसे,धागी बांधून गेली,
नवीच दरवळ भोवताली,काहीशी गंधून गेली;
स्थिरतेतही झुला झोकी,हवी झुलवून गेली,
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!
दोन ओठास चार,ओठी जुळवून गेली,
हातून माझ्या कुणास,गजरा मळवून गेली,
चंचल मनास शांतवून,भाव स्थुलवून गेली,
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!
उघड्या छाती मखमलीस,हात फिरवून गेली,
माझ्या अहं-पणास,स्वाधिकार मिरवून गेली;
चुटकी वाजवून अवाक,नजरेस हलवून गेली,
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!
मोगरा,निशिगंध काहीच,न जाती सांगून गेली,
मंद सुगंध दवीत,अंगी आन्गुन गेली;
अंग फांदीस सुक्या,रोमांच फुलवून गेली;
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!
शहार्त्या थंडी रेशमी,उब गर्मावून गेली,
स्व-व्याकुळता मिठी माझ्या,नजरी फर्मावून गेली;
उत्तुंग भावनि अधिकच,खपली उलवून गेली;
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!
गोड झोपी पापणी,अधिक लवून गेली,
नित्य कोरडी रजनी,आज दवून गेली;
गझलून रात्र माझी,दाद डूलवून गेली;
एक कळी स्वप्नी आज….. पाकळी खुलवून गेली...!
No comments:
Post a Comment