खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
"तुझ्यावीना"जगणे आता
मलाही मंजुर नाही.
NiKi
Thursday, March 15, 2012
मनाच्या तळ्यावरती
आठवांचे पक्षी आले
तुझ्या जुन्या पाऊल खुणा
त्यात माझे ठसे ओले
तळहाती तुझ्या-माझ्या
सारख्याच रेषा रेषा
दोन सावल्यांची जणू
एक बोली एक भाषा
आभाळाची ओढ लागे
उडे मनाचे पाखरू
पुन्हा पुन्हा जन्मते मी
एकाच ह्या जन्मी जणू....
No comments:
Post a Comment