कृष्ण मुरारी होईन मी
तू प्रीतबावरी मीरा हो
महादेवाच्या माथ्यावरची
गंगेची तू धारा हो………
कृष्ण सावळा होईन मी
तू अल्लड अवखळ राधा हो
मिठीत शिरता सांज सकाळी
फुलता फुलता मुग्धा हो………
चक्रपाणी होईन मी तू
गीतेमधली वाणी हो
पहाटलेल्या स्वप्नामधली
तू एकटी राणी हो………
मीरा हो तू, राधा हो तू
हो गीतेची वाणी
तुझ्याचसाठी भोगीन मी
पुन्हा मानवी योनी………
तुझ्याचसाठी पुन्हा एकदा
जन्म येथला घेईन मी
तुझ्या दुखाच्या प्यालामधला
थेंब सुखाचा होईन मी.………
No comments:
Post a Comment