NiKi

NiKi

Tuesday, March 20, 2012

"निरोप तुझा घेताना, का गं पाऊल जड होतं...?"

निरोप तुझा घेताना, का गं पाऊल जड होतं...?
इतक्यावेळ निपचीतलेलं माझं मन धडधडतं...
काहूर माजतं मनात, मन पाखरासारखं फडफडतं...
बुरुज जरी अभेद्य याचा, हे शरणागत गड होतं...
निरोप तुझा घेताना, का गं पाऊल जड होतं...?

तुझा हात असतो हातात...न्यारं तमाशाचं फड होतं...
तो सुटतो जेव्हा हातातून, डोळे पाणी...काळीज दगड होतं...
स्पर्श तुझा विरतो आणि हे बोथट.. बोजड होतं...
वस्तीपासून दूर...माळरानातलं एकाकी 'वड' होतं...
निरोप तुझा घेताना, का गं पाऊल जड होतं...?

समजावतो, तू भेटणारचं आहेस काहीच दिवसांत...
पण तरीही हे हट्टी, अल्लड होतं...
कुरकुरतं, धुसमुसतं... समजावणं खरच खूप अवघड होतं...
कल्पनेनं विरहाच्या, हे भांबावतं... वेडं होतं...
निरोप तुझा घेताना, का गं पाऊल जड होतं...?

No comments:

Post a Comment