NiKi

NiKi

Friday, March 30, 2012

वाटते मनाला माझ्या पंख द्विजाचे असावे
असशील तू जेथेही भेटण्यास उडत यावे ।
वाटते मनाला माझ्या कोमल स्वर शब्द व्हावे
तुझ्या हंसर्या ओठांवरती नाचत फुलत उमटावे।
वाटते मनाला माझ्या मधुर सुगंधी फुल व्हावे
हारामध्ये गुंफुनि तुझ्या सतत कंठी राहावे ।
वाटते मनाला माझ्या रक्ताचा थेंब व्हावे
प्रेमळ हृदयांत तुझ्या कायमचे वास्तव्य करावे ।
वाटते मनाला माझ्या मंद सुगंधी वारा व्हावे
अन तुझ्या अंग-अंगाला हळुवारपणे गोंजारत रहावे ।
वाटते मनाला माझ्या आभाळीचा मेघ व्हावे
प्रीत-धारांनी तुला पूर्णपणे भिजवून टाकावे ।
वाटते मनाला माझ्या तुझ्या नेत्रींचे अश्रुं व्हावे
सुखाने व दुखाःने सुटता तुझ्याच ऊरी विराजावे ।।

No comments:

Post a Comment