NiKi

NiKi

Monday, March 26, 2012



तसं सोपं असतं कविता करणं

शब्दाला शब्द जुळवणं..

अवघड असतं ते कविता रुजून येणं

स्वप्नील गंधील क्षणी फुलून येणं..

भावनांच्या लहरींवर झोकून देणं..

कविता असावी कशी..

मनातल्या गंधकोषी

जपता यावी अशी

अलगद उमलणारी

अन अंतरंग व्यापणारी

कविता हवी सुरावटींची

साद घालणार्‍या तरलतेची

मन्मनातल्या गोड गुपिताची

सुंदरतेची अन कुरूपतेची

बालपणाची अन वार्धक्याचीही

अगाध अगम्य आयुष्याची

जितकी रम्य सुर्योदयाची

तितकीच हसर्‍या सुर्यास्ताची

अवखळ चंचल सरितेची

अन शांत प्रगल्भ सागराचीही

ती हळूवार जणू कळी निशिगंधाची

ती प्रखर बंधन मुक्ततेची

वेदनांची अन चटक्यांची

आर्त भीषण वास्तवाची

खोल खोल रुजू पहाणारी

कविता हसर्‍या गाण्याची

गोजिर्‍या स्पंदनांची

तुझ्या माझ्या स्वप्नांची…

No comments:

Post a Comment