ती’.
त्याच्या अखंड प्रेमात बुडालेली.
बडबडी. हसरी.
आणि ‘तो’
काहीसा अबोल. शांत. स्वतत हरवल्यासारखा.
एक दिवस ती चिडते. वैतागते. तिला वाटतं, इतर मुलं आपापल्या ‘तिच्या’विषयी किती भरभरून बोलतात. तिची तारीफ करतात. आणि हा गप्पच.
ती त्याला विचारतेच, ‘मी छान दिसते असं तुला वाटत नाही का.?
तो म्हणतो, ‘नाही.!’
‘याचा अर्थ तुला आयुष्यभर माझ्यासोबत राहण्याची इच्छा नाही.’- ती.
‘नाही.!’- तो.
‘म्हणजे मी आत्ता याक्षणी तुला सोडून गेले तर तुलाच काहीच वाटणार नाही.!’- ती.
‘नाही.’- तो.
ती हा नन्नाचा पाढा वाचून अधिकच संतापते. चिडते. डोळ्यातलं पाणी पुसत चालू लागते.
त्यावेळी तो तिचा हात हात हातात घेत तिला थांबवतो आणि म्हणतो.
‘तू फक्त छान नाही दिसत, तू नितांत देखणी आहेस.!’
‘आणि मला तुझ्याबरोबर आयुष्यभर राहण्याची केवळ इच्छाच नाही तर ती माझी जीवनावश्यक गरज आहे.!’
‘आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तू मला सोडून गेलीस तर मी रडणार नाही. कारण रडण्यासाठी माणूस जिवंत असावा लागतो आणि तू सोडून गेलीस तर मी जिवंतच राहणार नाही.!’
ती हे ऐकून गप्पच होते. त्याक्षणी तिला कळतं, प्रेम म्हणजे फक्त शब्दात व्यक्त होणं नव्हे आणि जे शब्दात सांगता येतं तेवढंच समजणं नव्हे. प्रेम म्हणजे जे आपल्याला ऐकायला आवडतं तेच नव्हे. कारण जे आपल्याला ऐकू येत नाही, कळत नाही त्यापलीकडेही भरभरून देतं प्रेम. पण ते घ्यायला आपल्या मनाची खिडकी उघडी मात्र असायला हवी. नाहीतर गैरसमजाची जळमटं चढणारच नात्यावर.!
No comments:
Post a Comment