असावं कुणी जवळ श्वास आहे जसा,
पहिल्या थेम्बाशिवाय चातक जगेल तरी कसा?
आहे मनात काहूर तो सर्व सांगून टाकेन,
या पहिल्या थेम्बानंतरच माझी तहान भागेल…..
असावं कुणी जवळ ज्याचा मला आधार आहे,
इंद्रधनुष्य जसा त्याच्या रंगांशिवाय निराधार आहे,
माझ्या जीवन चित्रात रंग तिचेच असावेत,
आणि व्हावे असे काही कि चित्रच गोड हसावे…..
असावं कुणी जवळ जिने केसांतून हळूच हात फिरवावा ,
सुखावलेल्या मनाला मग फक्त तिचाच चेहरा दिसावा ,
जिच्याशी गप्पा करण्यात रात्र रात्र जागवाव्या,
वाटे मनाला हा सूर्य कधी न उगवावा….
असावं कुणी जवळ जिला फक्त नि फक्त माझान म्हणता यावं,
खोल पाणी जसं तिच्या डोळ्यात सतत पाहावं,
शब्द नसतानाही संवाद गोड व्हावा,
कधीतरी कातरवेळी तिचाच अश्रू नयनी दाटावा…..
सांग येईल का ती या चातकाला तिचीच आस आहे
थेंब तर बरेच आहेत पण
पहिलाच तो थेंब खास आहे
पहिलाच तो थेंब खास आहे…….!!!!
No comments:
Post a Comment