NiKi

NiKi

Friday, March 16, 2012



सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती

वीणेचे स्वर अबोल झाले
गीतामधले काव्यहि सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती

चंद्र चांदणे सरले आता
निरस जाहली जीवनगाथा
त्या भेटीतिल अमृतधारा
तुझ्याविना वीषधारा होती

थकले पैंजण चरणहि थकले
वृंदावनिचे मोहन सरले
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजुनि उखाणे मला घालिती

No comments:

Post a Comment