NiKi

NiKi

Friday, September 28, 2012

दुःख आणि प्रेम,
दोन्ही ही आपल्याला अश्रूं देऊन जातात..

फक्त फरक एवढा आहे की ????
...
दुःख केव्हा ना केव्हा संपते,
पण ????

प्रेम कधीचं संपत नाही..
(¯`v´¯)
आठवण येते म्हणजे नक्की काय रे?

तसा तु कायमच असतोस अवतीभवती

छेडत, फ़ुलवत, रिझवत आणि झुलवत सुद्धा..
पुस्तकाच्या एखाद्या ओळीतुन हळुच डोकावुन विचारतोस...
...

आठवली का ती संध्याकाळ?

... नकळतच मग पुस्तकाच्या पानांपानांवर उडु लागतात तुषार

त्या संध्याकाळच्या आठवणींचे..

हास्याची किनार उमटते चेहेर्यावर... अन..

तुझ्या चावटपणाच्या आठवणीने आसमंतात पसरतो रक्तिमा...

पण तु आत्ता हवा होतास रे इथे... ये ना..

रक्तचंदनी आभाळात अचानक दाटुन येतात पावसाळी ढग...
जणु कुठल्याही क्षणी बरसात सुरुहोईल...
अखेर टपोरे थेंब बरसुन आलेच..
रेशीमधारा झेलताना काही क्षण.. अगदी काही क्षणच फ़क्त
तुझ्या आठवणीही शोधतात आडोसा...
तेवढ्यात गालावर रेंगाळलेल्या थेंबाआडुन पुन्हा तु डोकावतोस...

आणि पुन्हा सुरु होतो आठवणींच्या पाठशिवणीचा खेळ...!
एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला..
मनातल्या मनात आठवून गालातल्या गालात हसायला.......
एक क्षण पुरे तुझा आवाज ऐकायला...
कानातल्या कानात त्याची धून वाजायला......
एक क्षण पुरे तुझ्या डोळ्यांमध्ये पाहायला..
त्यांच्यातला प्रेम माझ्या डोळ्यांत साठवायला.....
एक क्षण पुरे तुझ्यावर भरभरून प्रेम करायला..
तुझ्या प्रेमासाठी क्षण क्षण तरसायला....♥♥ ♥
हे मन फ़क्त तुझ्यासाठी....
मनातील या भावना फ़क्त
तुझ्यासाठी....
 
तुज्या माज्यात अंतर आहे
अंतरातच खरी ओढ असते
दूर झल्यावर जाणीव होते
प्रेम किता गोड असते

आठवणीत रमते मन
...
भास होतात क्षणोक्षणी
वेडे मन कसा वीस होते
तुला शोधते पदोपदी


आपल्यातल्या अंतराने
प्रेमाची किमत कळते आहे
प्रेमाशीवाय आयुष्या शून्य
जगणे सुद्धा व्याथ आहे....
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया
कधी उदास असू, तर कधी खुदकन हसतायेईल
हृदयामध्ये थोडी अशी जागा -
...
जीवनाच्या वाटेवर दमलोच कधी,
तर तुझ्या सोबतीने बसता येईल
पण ज्या छळतील आपल्याला अशा
आठवणींचा गाव नको देऊया,
असंच राहू दे ना आपलं नातं ,
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!
प्रेमात नेहमी दुःखच असते .
मग कश्याला त्या दु:खाच्या वाट्याला जाउया
प्रेम आहे न दोघात हे फक्त
आपल्या नजरेला कळू देउया
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया !! —
खास माझ्या प्रेमासाठी खास
तुझ्यापासून दूर अजून किती दिवस राहायचे..??
...


पाण्याच्या एका थेंबासाठी चातकाने अजून किती वेळ झुरायचे..??
तुझ्यापासून दूर आता खरच राहवत नाहीये...
तहानलेल्या चातकाला पावसाची वाट पाहवत नाहीये...
आयुष्याचा हिशोब कसा अजब होऊन बसलाय...
मिळवले तरी तूच.....
आणि बघितले तरीतूच...
व्यर्थ माझे हे आयुष्य
अन व्यर्थ माझे हे जीणे....
तुझ्यावर केलेल्या चारोळ्याला तूच दाद न देणे....!!!

पाहुन अक्षरे अनोळखी...शब्द हि लाजले.....
पाऊल माझ्या अंगणी जाणे कुणाचे वाजले....
.
.
...

आता अक्षरे हि बोलती,सांगायचे काही तरी
शब्द हि सांगती,मागायचे काहीतरी.........
.
.
मी नभातून शब्द हि मागुन ऐसे आणले......
पावसात पहिल्या जसे मोर नाचू लागले.......
.
.
मोरपीस ओळखीचे मी तुझे कुरवाळतो ......
तुझे अनोळखी शब्द मी,गीतात माझ्या माळतो....
.
.
आता नाही पाऊले,मागणे अन मोरपीसही.....
अता फक्त मीच मजला एकटे सांभाळतो......
.
अता फक्त शब्द माझा मज एकटा सांभाळतो
तुला पाहिलं की
अस काय होवून जात
माझ मन मला
कस विसरून जात
तुझ्या डोळ्यात पाहून
भान हरवून जात
...
तुला घेवून मन
नभात उडून जात
तुझ्या केसात हरपून
मन गुंतून जात
त्या रेशीम जाळ्यात
मन गुंफून जात
तुझ्या गोड हसण्यान
मन फसून जात
गालावरच्या खळीवर
मन खिळून जात
तुला पाहिलं की
मन वेड होत
कळत नाही कस
मनात प्रेम उमलून जात .

प्रेम म्हणजे....
रोज रात्री आकाशात तारा तुटतो का हे पाहणं..
आणि तुटणाऱ्या ताऱ्याकडे तो फक्त आपलाच व्हावा हे एकच मागणं ...
प्रेम म्हणजे...
डोळे बंद केले कि त्याचाच चेहरा डोळ्यासमोर येण...
आणि डोळे उघडले कि त्यालाच शोधण....
...
प्रेम म्हणजे...
एकांतात त्याची आठवण येण....
आणि चारचौघात सुद्धा फक्तत्याच्याच विचारात बुडणं..
प्रेम म्हणजे...
कधीही न आवडलेल्या गोष्टी...
फक्त त्याला आवडतात म्हणून आवडून घेण...
प्रेम म्हणजे...
त्याच्या गुणांवर भाळण...
पण त्या पेक्षाही त्याच्यात असणार्या दोषान सहित त्याला स्विकारण....
प्रेम म्हणजे...
त्याच या जगातील अस्तित्वसंपलय...तरी...
निव्वळ त्याला दिलेल्या वचनामुळे डोळ्यात अश्रू असून सुद्धा ओठावर हसणं असतं





"खुप लोकांना वाटते कि I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत...
पण
खरं तर...
"I LOVE YOU TOO"
हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत...!! ♥ ♥ ♥
रातीच चांदणं,
आज माझ्यापाशी आल..
" तू कुठे आहेस?..."
अस हळूच म्हणाल...
मी त्याला सांगितला तुझा पत्ता,
अन विचारल...
...
"काय रे, काय झाल ?? "...

तर ते चांदण म्हणत कस..
"आकाशातला चंद्र, आज आहे रजेवर,
म्हणूनच तर...
तुझ्या चंद्रात,
मी माझा चंद्र शोधाया आलो...
तुझ्याच चंद्राला पाहून...
आजची रात काढाया निघालो... "
तुझ्याच चंद्राला पाहून...
आजची रात...
... मी काढाया निघालो... "
" फक्त त्या वेळी मी तुझा विचार नाही करत .....

ज्या वेळी मी झोपलेला असतो,
 

कारण त्यावेळी दिवसभरातील विचारांनी बांधलेलं

 स्वप्न मी बघत असतो "

Thursday, September 27, 2012

किती आवडावे मला तू... तुला मी...
तरी का छळावे मला तू... तुला मी...

जसा चातका आठवे पावसाळा
तसे आठवावे मला तू... तुला मी...

सखे पारिजाता सवे देत राहू
हळू हेलकावे मला तू... तुला मी...

सदा दर्पणी पाहतो एकमेकां
अता ओळखावे मला तू... तुला मी...

जगू ग्रीष्मही हा वसंताप्रमाणे
ऋतू पांघरावे... मला तू... तुला मी...

जसा हात द्यावा धरेला नभाने
तसे सावरावे मला तू... तुला मी...

जिथे प्रेम आहे, तिथे ईश आहे
सदा आळवावे मला तू... तुला मी...

Wednesday, September 26, 2012

खास तिच्यासाठी...
ज्या दिवसापासुन पाहिले मी तुला त्या दिवसापासुन प्रेमात पडलो
मी तुझ्या त्या दिवसापासुन मनात सारखा तुझाच विचार येतो
कारण मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो
मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो
याचा अर्थ असा होंत नाही की मी तुझ्या शरीरावर प्रेम करतो
मी प्रेम करतो तुझ्या शांत स्वभावावर, प्रेमळ मनावर, चांगल्या बोलण्यावर आणि
तसेच तुझ्यावर
जेव्हा देव तुला घड़वित असेल तेव्हा देवाने सुद्धा खुप विचार केला असेल
आणि जेव्हा तू त्यातून निर्माण झाली असली तेव्हा तुला देवच पाहत बसला असेल
इतकी सुंदर दिसतेस....
तुझ्याचं हृदयात राहायचं मला..

तुझ्याचं आवडीचं व्हायचंय मला..

तुझ्या ओठातलं गीत व्हायचंय मला..

तुझ्या संगतीत बहारायचंय मला..

तुझ्यासाठीचं जगायचंय मला..

...
तुझ्या हृदयात राहायचंय मला..

तुझ्या स्वप्नातील राजकुमार व्हायचंय मला..

तुझ्या मनातील एक पान व्हायचंय मला..

तुझ्या बरोबर राहून..

आयुष्याला नवीन वळण
द्यायचंय मला..

तुझ्या सुःखातील जोडीदार..

तुझ्या दु:खातील भागीदार व्हायचंय मला..

तुझ्याचं हृदयात राहायचंय मला..

तुझ्यात गुंतून जायचंय मला..

तुझ्याचं नशेत डुबून जायचंय मला..

तुझे सौंदर्य डोळ्यात टिपून ठेवायचंय मला..

तुझ्यात हरवून जायचंय मला..

आणि नंतर तुझ्यातचं शोधायचंय मला..

कसं सांगू मी तुला..

तुझ्याचं हृदयात रहायचंय मला....
कुणीतरी अचानक आयुष्यात येतं
परकं असूनही आपलसं होऊन जातं.
खुप काही सांगयचं असतं खुप काहीबोलयचं असतं
शब्दच फुटत नाही , सर्व काही मौनातच घडतं......

कुणीतरी अचानक आयुष्यात येतं
ह्रदयच्या कोप-यात त्याच नाव कोरल जातं
प्रत्येक क्षणी मन त्यालाच शोधत राहतं.......
त्याचा वाटेवर मन रोखु पहातं
सावली बनुन त्याच्या सोबत रहावस वाटतं
...
कुणीतरी अचानक आयुष्यात येतं.....

कळी प्रमाणे मन दपु पहातं
नजरेत मात्र गुलाबचे फुल उमलुन जातं....

कुणीतरी अचानक आयुष्यात येतं
आणि आयुष्यच बनुन जातं

खरचं का; कोणी अचानक आयुष्यात येतं
Your friendship and love,
And all the wonderful things
That they bring into my life,
Are like nothing else
I have ever known.

My heart is complete
With the love we share,
And our love grows more
Beautiful each day.
...

I love you,
And as long as we are together,
I have everything I need.

You are with me always...
In a smile, a memory, a feeling
Or a moment we share.

You will always be
My Forever Love
कधी कधी कळतच नहीं आपण काय करतोय,
नकळत कुणाच्या भावविश्वात असे रमतोय,
वाटते की तो मार्ग आपला नाही,
पण न राहूनही मन तिकडेच वळतय,
काय सांगावे मनाला काहीच सुचत नाही,
काय म्हणावे याला हेच कळत नाही,

प्रित अशी ओढत घेवुन जाते,
साद तिची कानी एकु येते,
नाद असा घुमतो हा तिचा,
...
मन माझे बहरून जाते,
वेडावलेले मन थांबेल कसे,
तिच्या येण्याची फ़क्त वाट पाहत असे,

असेच होते जेव्हा प्रेम होते,
अनोळखी मन आणि नविन नाते,
हावी हवीशी वाटते ती प्रत्येक आठवण,
फ़क्त तिचे रूप आणि मनातील साठवण,
प्रत्येकाच्या जीवणात ही वेळ येते,
प्रेमामधे जेव्हा मैत्रीची भेळ होते,
प्रेम हा वेड्यामनाचा खेळ असतो,
कुणा एका अनोळखी व्यक्तिशी झालेला मेळ असतो......
चंद्र आणि मी........
मध्य रात्रीची वेळ होती, झोप येतच न्हवती
म्हणून खिडकी जवळ येऊन उभा राहिलो
तेव्हा आकाशातला चंद्राचा प्रकाश डोळ्यावर येऊन पडला
तारे त्याच्या भोवती लुक लुक करत जगमगत होते
मी चंद्राकडे टक लावून बगत होतो
तेव्हा चंद्राने विचारला काय रे काय बाग्तोस एवढा टक लावून
माझ्याकडे?
मी म्हणालो काही नाही रे असच
चंद्र परत म्हणाला काय काही नाही कोणाला शोधतोस सांगशील
...

का मला?
अरे तिला शोधतोय खूप आठवण येतेय तिची
कशी असेल काय माहिती माझ्या विना?
ए चंद्रा तू संग ना रे तू तर सर्वाना बगत असतोस आकाशा मदनं?
मी का सांगू तूच सांग ना खूप प्रेम करतोस ना तिच्यावर?
मग सांग काय करतेय ती?
असेल माझ्यासारखी तिच्या खिडकीपाशी आकाशात मला शोधत
आठवण काडून माझी रडत असेल, डोळ्यातले अश्रू थांबता थांबत
नसतील
खूप प्रेम करते ना माझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त, नाही राहू शकत
माझ्या विना
चंद्र म्हणाला कसा रे एवढं सर्व ओळखलस तिला न
बगता आणि तिच्या जवळ नसताना?
अरे मी पण खूप प्रेम करतो तिच्यावर आणि माझं मन मला सांगतंय
ती खूप त्रासात आहे ते
मी चंद्राला बोललो तू करशील का रे मदत माझी, देवाला सांगशील
का आमच्या बदल
तू तर देवाच्या एकदम जवळ आहेस
सांग ना रे देवाला आमची मदत करायला
आम्हाला परत एकत्र आणायला, सांगशील ना रे?
चंद्र बोलला सांगीन ना कारण मला सुधा वाटतय तुम्ही एकत्र यावं
मी नक्की सांगीन कारण अशे खरे प्रेम करणारे खूप कमीच असतात
या जगात
तुमचं प्रेम जणू निराळच आणि जगावेगळच आहे
तुम्ही दोघं एवढं मनाने जुळले आहात की दूर राहून सर्व
एकमेकांना ओळखतात
खरच तुमचं प्रेम अप्रतिम आहे
कदाचित देव तुमच्या प्रेमाची परीक्षाही घेत असेल,
पण तुमचं प्रेम बघून देव तुम्हाला नक्की एकत्र आणेल
तो बगत असेल तुम्ही दूर राहून सुधा एकमेकांवर तेवढच प्रेम कराल
का?
मी चंद्राला बोललो, ही कसली परीक्षा ज्यात अश्रू आणि दुखच
जास्त
एवढा त्रास सहन करावा लागतोय बघतोस ना चंद्रा तू
आणि मला दुखात नाही बगायचं आहे रे तिला
तिच्या आयुष्यात का कमी दुख आहे की आजून हा त्रास सहन
करायचा तिने
माझ्यासाठी नाही निदान तिच्या खुशीसाठी तरी एकत्र आन आम्हाला
तिला खुश बगायचं आहे नेहमी आणि ते माज्या विना मुमकीन
नाही आहे रे
चंद्र बोलला मला कळतंय रे सर्व आणि मी तुझा निरोप नक्की देईन
देवाला
तू काळजी करू नकोस सर्व ठीक होईल
चल जा आता झोप तू खूप उशीर झालाय आणि ती पण झोपली आता
तू पण झोप आणि मी पण थोडा आराम करतो असा म्हणत चंद्र पण
ढगा आड लपून गेला
तारे पण लुक लुक करून कुठे गायब झाले कळलच नाही
चंद्राशी बोलून मन हलकं झाल्यासारखं वाटलं
नंतर मी सुधा खिडकी बंद करून झोपी गेलो. ...

तुझ्यावर जेवढं प्रेम केलं,

तेवढं कोणावरचं केलं नाही..

पुन्हा कोणावर एवढं प्रेम करेन,

असं आता वाटत नाही..

माझ्या आयुष्यात जे तुला स्थान दिलं,

...
ते स्थान कोणी कधी मिळवलचं नाही..

पुन्हा ते स्थान कोणाला मिळेल,

असं आता वाटत नाही..

तुझ्याशी जे नातं जोडलं,

ते नातं कधी कोणाशी जोडलचं नाही..

पुन्हा कधी ते जोडेन कोणाशी,

असं आता वाटत नाही..

तुला जेवढं सामावून घेतलं
मी डोळ्यात,

तेवढं मी कोणाला पाहीलं देखील
नाही..

पुन्हा कोण ह्या डोळ्यात दिसेल,

असं आता वाटत नाही..

जी रहस्याची दारे तुझ्या समोर
उघडली,

ती दारे कधी कोणासमोर उघडलीचं
नाही,

पुन्हा ती दारे कधी उघडतील,

असं आता वाटत नाही..

कारण ?????

माझं जीवनचं एक रहस्य बनलय,

ते फक्त तुलाच उमगलेलं कोडं बनुन
राहिलय..

ते कोडं आता माझ्यानेही कधी सुटेल,

असं आता वाटत नाही..
पुन्हा एकदा भेटायचय...
खूप दिवसानंतर तुला डोळे भरून पहायचय

पुन्हा एकदा भेटायचय...
तुझ्या हातात हात घालून खूप खूप फिरायचय

पुन्हा एकदा भेटायचय...
तुझ्या खांद्यावर डोके ठेऊन शांतप्रेम अनुभावायचंय

पुन्हा एकदा भेटायचय...
...
तुझ्यासाठी झुरलेल्या क्षणांना तू मजाच आहे
दाखवून द्यायचंय

पुन्हा एकदा भेटायचय...
माजे बोलणे कधीच बोलबच्चन नवते हे तुला पटवून द्यायचंय

पुन्हा एकदा भेटायचय...
विरहात सहन केलेल्या क्षणांना थोडाकाळ
तरी घालवायचं

पुन्हा एकदा भेटायचय...
रोज रात्रीच्या स्वप्नांना एक क्षन तरी खर करायचं

पुन्हा एकदा भेटायचय...
नाही जलस मजा तरी एकदा तुझ्या गळ्यात पडून
खूप खूप रडायचं

बोल ना पुन्हा एकदा भेटायचय..
माझ्या साठी तू ....

हळुवार फुंकर आहेस तू पानावर राहिलेला शेवटचा थेंब आहेस तू

समुद्रात सापडलेले शिंपले आहेस तू

पहिल्या पावसात भिजताना होणारा आनंद आहेस तू

वहीतल्या सुकलेल्या गुलाबाची पाकळी आहेस तू

...

उन्हात मिळणारी सावली आहेस तू

बोलताना हळूच अडखलणारा शब्द
आहेस तू

गालवर पडलेला पापणीचा केस आहेस
तू

मनात येणारा पहिला विचार आहेस
तू

तू माझा आभास आहेस, प्राण आहेस,
श्वास आहेस तू

पायात काटा गेला कि होणारी वेदना आहेस
तू रडू आल्यवार
येणारा पहिला हुंदका आहेस तू

रडून झाले कि फुटणारे पहिले हसू
आहेस तू

चिडलो कि येणारा राग आहेस तू

झोपलो कि पडणारे स्वप्न आहेस तू

सकाळी उठल्यावर येणारा आळस
आहेस तू

आयुष्यातली सोबत आहेस तू

आयुष्य संपताना सोडून जाणारा श्वास आहेस तू

कमाल आहे एवढे
सांगून सुद्धा विचारत
कोण आहे मी तुझ्या साठी.... ♥ ♥

ती आहे...
अळवावरचे पाणी...
जे हाती कधी लागत नाही...
आहे एक मृगजळ...
ज्याने तृष्णा कधी भागत नाही...

ती आहे...
एक स्वप्न...
जे कधी सत्यात येणार नाही...
आशेचं वेडं पाखरू...
...
जे फिरुन घरट्यात येणार नाही...

फुलाहून नाजूक ती...
जणू चंद्राची चांद्णी आहे...
ती अस्मानीची परी...
माझ्या हृदयाची राणी आहे...

कवितेतून भेटते ती मला...
तिचे गोजिरे रूप घेऊन...
माझ्या मनातून संगीत वाहते...
शब्दांचे सुंदर साज लेऊन...

धुक्यात हरवत्या वाटेवरती...
मला ही धुंदीत राहायचे आहे...
माझ्या प्रेमाचे प्रतिबिंब...
तिच्या डोळ्यात पाहायचे आहे...

तिने यावे...
चंद्र-ताऱ्यांचे पैंजण पायी लेऊन...
भ्रमराला ही धुंद करणाऱ्या...
फुलांचे सुगंध घेऊन...

ती येताच..
काळाचे धावते पाऊल...
अचानक थांबावे...
ते एक क्षणाचे स्वप्न...
मी अनेक युगे जगावे...

प्रेमाची ही पाऊलवाट..
या भटकनार्याला नवी आहे... आयुष्याच्या या वळणावर...

तिचीच साथ
मला हवी आहे..
फक्त...
तिची साथ मला हवी आहे.. ♥
बरसून जाऊ दे तुझ्या डोळ्यांतला पाउस
हूर हूर मनाला लावून अशी नको जाउस
ओसरून जातील हे ही ढग दु:खाचे
पण चांदणे, अशी तू उदास नको राहूस,
बघ खिडकीशी उभा हा खट्याळ वारा
सागर ही बघ सोडून त्याचा किनारा
तुला हसवण्या आला आसमंत सारा,
चल स्वागत कर त्यांचे, डोळे पूस,
चांदणे, अशी तू उदास नको राहूस,
हिरमुसलेला तुझा हा अबोल चेहरा
...
कुठे गेला तुझा तो रंग हासरा?
खळाळू दे तुझ्या हास्याचा अवखळ झरा
आता आसवांचा पूर नको वाहूस,
चांदणे, अशी तू उदास नको राहूस,.....!!!

Tuesday, September 25, 2012

तुझ्याशिवाय जगणं काय जगण्याचं
स्वप्नसुध्दा पाहू शकत
नाही,श्वासाशिवाय काही क्षण मी जगू
शकतो,पण तुझ्याशिवाय एकही क्षण जगू
शकत नाही
काही नाती असतात पालवीसारखी,
बहर ओसरला की कोमेजणारी,
आणि काही असतात तुमच्यासारखी,
जपावी तेवढी बहरणारी


समुद्र काठावर रंगीबेरंगी शिँपल्यांची रास असावी..
आपण गुंग होऊन त्यात खेळत बसावं..
अगदी सहजपणे त्यातला एक शिंपला उचलून उघडावा..
अन त्यात मोती सापडावा अगदी..
तुझ्यासारखा...!



प्रेम शिवाय सुंदर
या जगात काही नाही...

पण माझ्यासाठी "तुझ्याशिवाय"
सुंदर नाही काही............:)
"प्रेमात कळतात बोल डोळ्यांचे...
डोळे शब्दांचे बांधील नसतात...
फक्त नजरानजर इशारयांची...
त्यात दोन्ही दिल सामील असतात...!"
तु सोबत असलिस की..
एकटक तुला पाहावेसे वाटते..
तु पाहुन हसलिस की..
तिथेच तुझे व्हावेसे वाटते.. —

आठवणी खुलवतात ... आठवणी पाणावतात

अबोल राहुनी ... अतोनात बोलतात ,

आठवणी रमवतात ... आठवणी झुरवतात

मनी वसुनी ... मनांस जोडतात ...!!
आज तुझ्यासाठी लिहिताना
शब्द अपुरे पडत आहेत,
माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी
शब्दच शब्द शोधात आहेत
देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल,
तिथे मागितलेली प्रत्येक खुशी तुझी असेल,
जेव्हापण तुझ्या ह्रदयाला प्रेमाची हाकऐकू येईल,
ती प्रेमाची प्रत्येक हाकमाझी असेल...!!

वाट पाहतेय त्या शब्दाची....
शब्दातल्या गोडव्याची
न गायलेल्या काव्याची
बोलक्या त्या नयनांची
वाट पाहतेय तुझ्या येण्याची....
तू येऊन माझा होण्याची
...
सारं काही तुला देऊन
तूझं होऊन जाण्याची
वाट पाहतेय त्या धुंद नज़रेची.....
न बोलता व्यक्त होणाऱ्या विचारांची
वाट पाहतेय तुझ्या भेटीची....
. त्या निशब्द सहवासाची
फ़क्त तुझ्यात गुंतून
सर्व काही विसर पडण्याची.....!

वाटतं सुखानेही तुझाकडे धाव घेतांना
अचानक होणारा स्पर्श जाणावा
चुकून डोळयातून थेम्ब गळला
तर माझा मनातला घाव भरून यावा

वाटतं तुझ्या आयुष्याच्या वाटेवर
...
सर्वत्र पसरली मखमल असावी
चुकून एखादा काटा कधी रुतला
तरी वेदना फुलाहून कोमल असावी

वाटतं देवानेही तुझ्यासाठी
नवस न बोलता पाववं
तू हाक मारन्या आधीच
स्व खुशिने तुझा कड़े धावाव

तस् खुप वाटतं तुझ्याविषयी
पण हा कागद आहे म्हणुन बरं आहे
अणि ऐकायच झाल तर तुला
अखंड आयुष्य अपुर आहे

मागतोए बस सुख तुझाकरता
तो तुला मझ्याशिवाय पण मिळावा
कृष्ण येतो रोज नभातून
कालिंदीच्या तीरी
राधा येते शोधात तेथे
दोघांची बासरी
सूर तेच पण कृष्ण नव्हे तो
सांज राग हो नीला
...
तीरावर राधेला शोधात
कृष्ण बने सावळा
वाळूवरती कृष्ण शोधतो
तिच्या सांडल्या हाका
राधा राधा सांग त्याला
कालीखाचा ठेका
गगन निळे अन रात सावली
भेट अनावर रोज
कृष्ण कृष्ण अन राधा राधा
गात पसरते सांज.......
मी उन्मत्त रानवारा
मी गर्द झाडीचा गारवा ॥
मी अथांग समुद्र किनारा
मी सह्याद्रीचा पहारा ॥
मी सप्तसुरांच्या तारा
मी इंद्र्धनुषी मोरपिसारा ॥
...
मी कोसळ्णा-या जलधारा
मी बोचणा-या गारा ॥
मी सुबक चंदनी देव्हारा
मी शांत अथांग गाभारा ॥
मी त्रिलोकातील ओंकारा
मी विश्वरुपी पसारा ॥
मी फ़क्त तुझाच सहारा
मी घनश्याम तुझा बावरा

कधी कधी तुझी आठवण
लपून ठेवलेल्या पत्रामधून येते
कधी जुन्या फोटो मधून तू हसतोस
कधी एका आवडत्या कविते मध्ये
तुझे संगीत मला ऐकू येते
तर कधी मनाच्या एका कोपऱ्या मध्ये
...
तू येऊन उभा राहतो
गुलाबाच्या ‘कधी-न-संपणाऱ्या’ सुगंधा मध्ये
मी तुझा अनुभवते
कधी माझ्या दैर्य च्या पानामध्ये तू दिसतोस
पावसाच्या थेम्बांमध्ये तुला
कधी कधी मी पाहते
तर कधी फुलांच्या रंगांमध्ये
तुझा रंग मला दिसतो
कधी ओठांवरच्या हास्याचे कारन
तू बनतोस ,
तर कधी डोळ्यात आलेल्या अश्रूमध्ये
सामावताना तुला पाहतेSee More
स्वप्नाच्या कल्पनेत रमतो मी तुझ्या बरोबर,
तुझ्या त्या गोड आठवणी ठेवतो मी माझ्या बरोबर.!

नाकळत स्वतःच्या मनाशी खेळत असतो मी,
तुझ्या बरोबर असल्याचे खोटे स्वप्न पाहत असतो मी.!

...
का कुणास ठाउक.?
तुझ्या आठवणींच्या स्वप्नात जागत असतो मी,!
लोकांसमोर नाही,

पण,

लपून एकटा रडत असतो मी.!
तु भेटावी मला,
४ शब्द बोलावे माझ्या बरोबर.!

तुला का कळत नाही की मला जगायचं आहे तुझ्या बरोबर,
प्रीतीच्या पाऊसात भिजून जावेसे वाटते
तुझ्या आठवणीत निजून जावेसे वाटते..
सरी-सरी ने बरसणारा पाऊस कधी धो-धो कोसळतो
तुझ्या प्रीती समान तो हि बरसतोय..
तुझ्या प्रीतीचे आभाळ कधी नुसतच दाटून येतंय
या गरजणाऱ्या ढगात कधी ते हि विरून जाते..
...
तुझ्या प्रितीच आभाळ कधी बरसतंय
नंतर पाऊसआचे थेंब माझ्या वर उधळते..
माझ्या रुक्ष जीवनाला ते नवचैतन्य देते
तुझ्या प्रीतीच्या पाऊस माझ्या वर सुखांची उधळण करते..
याच पुसत मी तुझ्या स्वप्नांची दुनिया सजविते...♥♥♥
फक्त तुलाच हवा म्हणून,
मी आज तो चंद्र शोधाया निघालो...
आभाळातून तो,
चांदण्यांच्या नकळतच चोराया निघालो...
तुझ्या एका हास्यासाठी,
आज मी सार्या जगाशी भांडया निघालो...
...
अन प्रत्येकाला हवा हवासा ,
तोच चंद्र...
आज मी फक्त,
तुझ्याचसाठी आणाया निघालो...
फक्त तुझ्याचसाठी...
... आणाया निघालो...

Sunday, September 23, 2012

"Getting out of control in love is not bad always, sometimes it is needed to show ur love.... A jesture to show your love that how much that person is mean to u...... A sudden kiss is a best example."
If a hug represent how much I love you,
I would hold u in my arms forever ♥♥


" Every day "
" Every time "
" Every where"
"I may not be with you...!!!
But
" My thinking ..!!! " My care ..!!!
...
" My msg's ..!!!
" My prayers..!!!
" My love..!!! &
" My lovely wishes are "always " with you ♥






♥ ♥ A simple hug from
the one you love is
the biggest
satisfaction in
the world......♥♥
b'Coz
...
u know you are in the right place even when
everything else is
wrong.... ♥♥:):) :):)


Thursday, September 20, 2012

The couple that fight the most,
Is the one most in love,
It shows they care enough,
To notice,
The other one screwed up and care enough to mention it,
To the person,
So they can fix it,
When u stop fighting,
It means u stopped caring........
 
One of the BEST feeling in this world is...
you HUG smOne u luv...
and they HUG u back even TIGHTER....!!! ♥ ♥ ♥

~ ♥ ♥ ~

Love


ι ƒєєℓ яєαℓℓу ѕρє¢ιαℓ ωнєη уσυ ѕαу ι ℓσνє
уσυ...heart heart

ι ƒєєℓ яєαℓℓу ѕρє¢ιαℓ ωнєη уσυ нσℓ∂ мє
ву нαη∂...heart heart

...
ι ƒєєℓ яєαℓℓу ѕρє¢ιαℓ ωнєη уσυ тєℓℓ мє
уσυ’яє му мαη...heart heart

ι ƒєєℓ яєαℓℓу ѕρє¢ιαℓ ωнєη уσυ нσℓ∂ мє
ωнєη ι ¢яу...heart heart

ι ƒєєℓ яєαℓℓу ѕρє¢ιαℓ ωнєη уσυ ѕαу ιтѕ
αℓяιgнт...heart heart

ι ƒєєℓ яєαℓℓу ѕρє¢ιαℓ ωнєη уσυ¢αℓℓ мє
нσηєу...heart heart

ι ƒєєℓ яєαℓℓу ѕρє¢ιαℓ ωнєη уσυ тєℓℓ мє ιм
тнє σηє...heart heart



Photo
 
Najar Ko Najar Ki Najar Se Na Dekho,
Najar Ko Najar Lug Jayegi.
Najar Ko Najar Lug Gai To,
Najar Ko Najar Se Najar Na Aayegi.

~~ ♥ ♥ ♥ ~~

bhool jaane de har baat, tu khud me aaj mujhe simatne de ♥
aaj ki raat lab khaamosh sahi saanso ko har baat kehne de ♥

kabhi jawaab teri baaton kaa hum aankhon se de diya karte the ♥
jo hai andhera aaj to phir labo ko milkar labo se sawaal karne de ♥
Photo: bhool jaane de har baat, tu khud me aaj mujhe simatne de <3
aaj ki raat lab khaamosh sahi saanso ko har baat kehne de <3

kabhi jawaab teri baaton kaa hum aankhon se de diya karte the <3
jo hai andhera aaj to phir labo ko milkar labo se sawaal karne de <3
 
“What would you do if I kissed you right now?"
 

I stared at the beautiful face and the beautiful mouth and I wanted nothing more than to taste it.

"I would kiss you back.”
"Getting out of control in love is not bad always, sometimes it is needed to show ur love.... A jesture to show your love that how much that person is mean to u...... A sudden kiss is a best example."

Touch my heart
&
u will feel,
Listen to my heart
&
u will hear,
...
Look into my heart
&
u will see that
U will alwayz be,
a special part of me! ♥♥



1Like · · Share
When I rest on ur shoulder I feel like I m living in my dream where I m spending my whole life with you, for a moment.... Just Awesome ♥ ♥ ♥
Photo: When I rest on ur shoulder I feel like I m living in my dream where I m spending my whole life with you, for a moment.... Just Awesome ♥ ♥ ♥
 

Tuesday, September 18, 2012

Monday, September 17, 2012



"ह्या जगामधे प्रत्येकाचे आयुष्य देवाने खुप छान असे रंगविले आहे,.......
मी देवाचा खुप खुप आभारी आहे कारण माझे आयुष्य रंगविताना त्याने तुझ्या नावाचा खुप छान असा रंग माझ्या आयुष्यात भरला आहे" ♥ ♥ ♥


I LOVE U..!!!




I am in love with you, you set me free. I can’t do this thing called life without you here with me ’cause I’m dangerously in love with you. I’ll never leave, just keep lovin’ me the way I love you.”...♥♥♥
Love isn’t winning someone,
but losing yourself to someone.

When you are LOVED by someone,
its not due to the excellence of your mind,

but due to the purity of your heart
♥  ♥

Girl: Will you pick me up if I ever fell down?

Boy: No.

Girl: Would you wipe away the tears when I’m sad..:(...?
...
...
Boy: Never.

Girl: Will you still love me when I look my worst?

Boy: Nope.

Girl: At least you’re honest …..:(((

Boy: I wouldn’t pick you up if you fell because I would catch you before you even hit the ground....♥

I wouldn’t wipe away your tears because I’ll make sure there’s nothing for you to ever be sad about....♥

I wouldn’t love you when you look your worst because that’s impossible. You always look you’re best, even when you think you don’t.....♥

I love you more than anything, always remember that......♥ ♥


I'll hold you close in my warm embrace,
Whenever you'll feel very sad and blue,
and
I'll let our love lead us to a place,
where there is no one but me and you..!! ♥


I cant be your first love but i promised to be
your last love".. !
Photo: "I am sorry that

I cant be your first love but i promised to be
your last love".. !
 
 

For Special Day

 

माझ्यापेक्ष्या तुझ्यात हरवून जाणं ...,
मला पसंत आहे ...
कारण तुझ्या डोळ्यात रमून जाण्यात ...,
एक वेगळाच आनंद आहे ...
फक्त एक kiss
तुझ्याकडून हवाय मला
तो गंध प्रीतीचा
अर्थ देईल जगण्याला
तोच दूर करेल
तुझ्या माझ्या दुराव्याला
...
कवटाळून ठेवीन हृदयात
मी त्या क्षणाला
फक्त तू इतकंच कर
तुझं मन निरागस कर
...
निर्मळ होईल मन तेव्हा
माझ्या गालाला स्पर्श कर
तुझ्या ओठांच्या पाकळ्यांचा
गंध माझ्या श्वासात भर
माझं देहभान हरपून
मला तुझा कर
मी बघेन वाट प्रिये
तुझ्या निरागस होण्याची
फक्त एक kiss हवाय
राहिलं आठवण तुझ्या प्रेमाची
एक भेदरलेले मन
अन गहन असा सूर
आलाप पावसाचा
मी मुमुक्षु असा दूर
...


विलोल कवळू कळीचा
तव तारुण्य उमले मनी गर्त
अन हा लटका बहाणा यौवनात
हाच तो निखळ कालोव्या तील नूर

हे शब्द काचयतेचे
माझे कवन ओलेताचे
हि ओढ कवलनांची
या कांचन मनी हि फुले मंजूर

शुष्क वाटे वारा
ही वाट जाहली ओंधट
हा र्हदयाचाच सारा ओत
अन चक्षुत ओथांबे पूर

एक भेदरलेले मन
अन गहन असा सूर
आलाप पावसाचा
मी मुमुक्षु असा दूर
तू मला का आवडतोस?
मला नाही माहित,
पण खूप आवडतोस,
इतकच मला माहित.......
ना तू राजकुमार,
ना तू खूप सुंदर,
...
तरीही तू खूप छळतोस मला,
किती लाजल्यासारखं होतं माहितीय??
हळूच तिरक्या नजरेने जेव्हा बघतोस मला.
मिठीत तुझ्या काय सांगू...वाटतं कसं?
देठावर कळीने अलगत उमलावं तसं, स्पर्शाने तुझ्या काय
सांगू...वाटतं कसं?
मयूरपंखाने अंगावरून सरकावं तसं...
मी काहीही केले तरी तुला ते सुंदरच वाटते, तुज्यासोबत मी न
जाने कितीदा संसार थाटते.
तू नेहमी विचारतोस ना मी इतकी सुंदर कशी?
सुंदर नाही रे मी....
प्रेमात मला पाहताना तुझी नजरच तशी.
आवडतं मला तुझं.....
माझ्या स्वप्नात येणं,
माझा हात चालता चालता तुझ्या हातात घेणं हे सगळं असंच
मला आयुष्यभर देशील का?
स्वर्ग नकोय मला...
असंच नेहमी तुझ्या मिठीत घेशील का?
अक्षरश: वेडी आहे मी तुझ्यासाठी,
फक्त एक कर माझ्यासाठी..
बाकी काही नाही दिलेस तरी चालेल,
फक्त खूप आठवणी दे मला....
Never get tired of doing little things for lovable persons because sometimes those little things occupy the 'Biggest' part in their hearts ♥

Wednesday, September 12, 2012

The Best Feeling Comes
When
We Both Fight Badly
And Then
Come To Each 0ther Crying,
Hug Each 0ther
And Say
I Love You Very Much Stupid ♥ :)

When You Are In a True Relationship..
No Matter How Much You Fight or Laugh,
Everything Ends In "I LOVE YOU" ♥♥♥
AGREE??


The True Meaning of "Sleeping Together" ...

Nothing dirty....Nothing Naughty....Just sleeping.
It’s just sleeping with that someone
'And knowing that they’re in your arms 'n you’re in theirs.
They want to feel close to you.
...
They want to know they are the closest to your heart.
They want to hear you breathe when you fall asleep as they sleep next to you.

As you fall asleep,
you want to cuddle with that someone 'n just the hold them close.
It’s that moment where you don’t want to let go
'n that moment where you don’t want them to forget that this is a special moment ...See More






रात्र होता काळोख गहिरा होतो...
निरव शांतता दाटलेली...
अशात काळोख मला वेढुन घेतो
मी शोधतो मला अन अधिक हरवुन जातो
कुठे वाट अन मी कुठे जात आहे
कसेतरी मी कुठे थबकुन घेतो...
रात्र ही कधिच आता संपणार नाही वाटते
काळोखाचीही सभोवार सावली दाटते
तेव्हाच तू येतेस
मला तुझा प्रकाश देतेस
मीही मग उजळु लागतो
या रातीची तू पहाट होतेस
सखी सोनकळी..नाजुक बाहुली
सखी पावलागणीक माझ्या.. माझीच साऊली...
सखी सैरावैरा धावणारा बेधुंद वारा
सखी माझी...माझ्यासाठी निखळणारा तारा...
सखी सागराची लाट ..अल्लडपणे झुलणारी
सखी शांत, गहिरी रात ..चांदण्यांत खुलणारी...
सखी सांजवेळ गुलाबी...माझ्याचसाठी सजणारी
सखी दवात न्हालेली सकाळ...हलकेच गाली लाजणारी...
सखी श्रावणाची सर...मुक्त होऊन बरसणारी..
सखी शब्द शब्द, सखी अर्थ अर्थ माझ्या कवीतेत उतरणारी
सात रंगात आज नहाले प्रेम तुझे...
नितळ, निर्व्याज जाहले प्रेम तुझे..
शब्दात माझिया या साठले प्रेम तुझे...
सुरांनी माझिया या गायीले प्रेम तुझे...
श्वास माझा प्रत्येक जगतो प्रेम तुझे...
क्षण माझा हर एक जिंकतो प्रेम तुझे...
पुन्हा रात आली...
चांदण्यांची बारात आली...
वाहणारा गंधित वारा...
चांदण्यांच्या चंचल शुभ्र धारा....
रातराणी गंधाळलेली...
तुझिया गंधास जणु ती माळलेली...
चांद उगाच सजलेला ...
पाहुन चांदणीला जरासा लाजलेला...
नदीचा काठ... हलकासा सूर..
नदीला आलेला सागराचा पूर...
तुझ्याच वाटेवर दाटलेलं धुकं....
ही रात, चांदणी, चांद, रातराणी तुझ्यापुढे सखये...सारंच फ़िकं................
प्राजक्त होऊन बरसते कविता माझी
रातराणी होऊन गंधाळते कविता माझी
अस्तित्व माझं जपते कविता माझी
शुन्य होतो मी..... जेव्हा लपते कविता माझी
मनात अशी दाटते कविता माझी
अलगद शब्दांत साठते कविता माझी
मनातले ओठी आणजे कविता माझी
भेद मनातले सारे जाणते कविता माझी
बनुन श्वास तनामनात भिनते कविता माझी
शब्दसखा मी...सखी वाटते कविता माझी.
शब्दांना सापडलेला मी म्हणजे कविता
शब्दांना आवडलेला मी म्हणजे कविता
भयाण रातीलाही काजव्याचं चमकणं म्हणजे कविता
अन पहाटेचं माझ्यासाठी क्षण्भर थबकणं म्हणजे कविता
कविता भिनलेली तनी मनी
कविता म्हणजे अर्धांगिनी..
कविता म्हणजे वसंताची सावली
कविता म्हणजे सोबतीण पावलोपावली
गहिर्‍या शांततेत या
मौन तुझे नी माझे
का असे ऐनवेळी बहरले?

हा दुरावा उगी का?
जाणुन जणू भेद मनीचे
तुझ्या पैजणांचे नाद झंकारले

हात हाती तुझा
आकाश चांदण्यांनी पेटले
श्वास गंधाने भारले

निरखुन तुला मी
नजरेत तुझ्या वीरुन जातो
होतो अताशा..अताशा सारे हारले

निखळला एक तारा...
तू मला मीळावी
त्याने हे उशिरा जाणले...

दव गाली तुझ्या...
रंग खुलुन आले
गंध प्राजक्ताचे भोवती दरवळले

रात सरली..
तरी मौन होते
नजरांनी नजरांना कित्येक इशारे केले

पुन्हा सजुन ये तू..
नजरेत विरुन जा तू..
जाताना मन हेलावुन गेले...
रात्र होता
तुझ्या साम्राज्याचा पाया मजबुत होतो
जगमगत्या जगाला
अगदी श्वासालाही कंप फ़ुटतो
हळुहळु तू गहिरा होत जातो
मलाही माझ्यापासुन हिरावुन घेतो
मी शोधतोच वाटा या काळोखात
पण महाकाय सावलीत तुझ्या हरवुन जातो
झाडं, पानं, फ़ुलं..
सारे सारे क्षणात हरवतात
दीवसभर फ़ुलांचे रस्ते
आता काटे रस्त्यावर दाटतात
सावलीही माझी मला सोडुन जाते
तीही तुझी आश्रीत होते

माझं अस्तित्व वीरु लागतं
नाईलाजाने तुझं अस्तित्व मान्य होतं
मीही मग थांबुन घेतो...
तुझ्या वीरण्याची वाट पाहतो
माझ्या भावनांचा
अविष्कार आहे
माझिया स्वप्नांचा
हा आकार आहे
शब्दांचा माझ्या
मला आधार आहे
शब्दात माझ्या
जीवनाचा सार आहे
शब्द माझे कधि
घोर प्रहार आहे
कधि प्रेमळ ते
अगदी हळवार आहे
शब्द माझे हे
माझाच अवतार आहे
मी अन शब्द माझे...एकतार आहे


नजरेत भाव तुझिया
नजरेत ठाव तुझिया

का छेडशी अशी मज?
नजरेत घाव तुझिया

नजरेस खेळवी तू
नजरेत डाव तुझिया

तू चोरशी अशी मज
नजरेत माव तुझिया

भिडतेस काळजाशी
नजरेत धाव तुझिया

घेतो जरा विसावा
नजरेत गाव तुझिया
वाटलं होतं,
पिंपळपान होऊन आता गळावं लागेल..
सुर्य पेटताना,
निखारा होऊन मलाही जळावं लागेल..

पावलांनाही समजावले
चालता किती जरी... वाट ही संपेना
कुठे जायचे...किती चालायचे
वाटेलाही अताशा उमजेना

घ्यायचाच होता श्वास शेवटाचा

ती श्रावणाची सर आली

ग्रिष्मातही वसंत खुलला
ती आयुष्याचा श्वास झाली

Tuesday, September 11, 2012

"U Know I don't need a pillow to sleep on,
I don't need the best bed,
I don't even need my Cute Teddy also.....
Whenever I get tired & need to relax... I just need ur chest to put my head on it, that would give me the best comfort" ♥ ♥ ♥
Photo: "U Know I don't need a pillow to sleep on,
I don't need the best bed,
I don't even need my Cute Teddy also..... 
Whenever I get tired & need to relax... I just need ur chest to put my head on it, that would give me the best comfort" ♥ ♥ ♥
 
That Sweet n Beautiful Moments
When u have the whole room to share with,
Yet u both sleep on a couch,
Close to each other ♥♥

आज मन वेडं...
आज मन धुंद
तुझ्या आठवणींत सारं सारं बेधुंद
तुझा स्पर्श, तुझे श्वास..
माझ्या शद्बांनाही तुझे भास
तुला लिहीतो तुला पाहतो
तुझ्यासवे हा अखंड प्रवास
उडावे आज अंबरी
तुझ्या अंगणी यावे
तुला पाहता क्षणात
त्या क्षणात जगुन घ्यावे
पुन्हा सांजवेळ..
.तुझ्या आठवांचा मेळ
पुन्हा चांदरात...
चांद पुन्हा भरात
तुझा गंध सभोवार...
हवेत दाटलेला
तुझ्या आठवणीत मी...
ओलाचिंब पेटलेला
तुला लपेटुन घ्यावं
तुझं होऊन जावं
तुझं सौदर्य आज सखे
तुझ्या नजरेने प्यावं...
अशी भर दुपार
बाहेर रणरणती उन्हं...
तुझ्या आठवणीच फ़क्त
बाकी सारं सारं सुनं
सुकलेली झाडं
सुकलेली पानं
तुझ्या आठवणीत माझं
विरहाचं गाणं
पुन्हा एक कविता
तुला वाहीलेली
पुन्हा माझ्या कवितेत
मी तुला पाहीलेली........
तू सर्वशक्ति.. तू सर्वसाक्षी
तू सर्वव्यापी.. तू सर्वगुणी
तू चराचर..तू निरंतर
आशीष असुदे मी पामर
तू रात तुच दीन
जल, थल, अत्र तत्र तुच तू
अणू रेणुत व्यापलास तू
तनी मनी वसलास तू
कामधेनु तू, तुच वत्सला
तू इंद्रायणी,सावळ्या तुच विठठला
तू धरा..अंबरात साठलास तू
दशदिशा..पाताळही गाठलास तू
शोधु तुला कुठे मी?
मिटता डोळे सुडौल देह डोळ्यात दाटलास तू
आज पुन्हा माझ्याकडे पाऊस पडला.....................................
भिजलेले थेंब आता
निथळतील पानावर
ओले थेंब...ओल त्यांची
भिज सार्‍या रानभर

वाट पाण्याखाली खोल
वर हिरवे डोंगर
निळ्या नभाळीचे मेघ
उतरले भुईवर

सर सर...सर आली
सुरा सुरात थेंब गाती
एक झुळुक वार्‍याची
कशी सरिला छेडती

एका फ़ुलावर एक थेंब
असा सजला...हसला
फ़ुल लाजले...खुलले
थेंब रुपाला भुलला

ओलं मन..ओलं तन
ओले थेंब अंगावर
आठवात एक फ़ुल
गंध त्याचा मनभर
माझ्या भावनांचा
अविष्कार आहे
माझिया स्वप्नांचा
हा आकार आहे
शब्दांचा माझ्या
मला आधार आहे
शब्दात माझ्या
जीवनाचा सार आहे
शब्द माझे कधि
घोर प्रहार आहे
कधि प्रेमळ ते
अगदी हळवार आहे
शब्द माझे हे
माझाच अवतार आहे
मी अन शब्द माझे...एकतार आहे
नाम कवीता माझी
बेनाम राहणार आहे
कवीतेत तुच माझीया
तुला न ती सांगणार आहे
आले गेले कित्येक ऋतु
ओले, कोरडे शब्द झाले
शब्द माझे जगणार आहे
कवीता ही खुलणार आहे
कधि मी सांजवेडा
कधि मी उन्मुक्त झुला
मलाच शब्दात मी
आता मांडणार आहे
कधि रात...दीस कधि
सप्नातही मी जागणार आहे...
शब्दात मीच माझ्या
शब्दांस माझ्या मी उमगणर आहे..
अंधार गडद दाटता...
मी चक्रावतो...
कुठे जायचे?
कुणा शोधायचे?
जड पावलांना किती ओढायचे?
नजरेआड झालेल्या वाटा...
हरवलेले साखे सांगाती...
मी एकटा..
तीही एकटी......
या एकट्याला ती
अशी साथ देते..
कविता म्हणवत स्व:तला
शब्दांत माझ्या फ़ुलारुन येते
शब्दांना सापडलेला मी म्हणजे कविता
शब्दांना आवडलेला मी म्हणजे कविता
भयाण रातीलाही काजव्याचं चमकणं म्हणजे कविता
अन पहाटेचं माझ्यासाठी क्षण्भर थबकणं म्हणजे कविता
कविता भिनलेली तनी मनी
कविता म्हणजे अर्धांगिनी..
कविता म्हणजे वसंताची सावली
कविता म्हणजे सोबतीण पावलोपावली
प्राजक्त होऊन बरसते कविता माझी
रातराणी होऊन गंधाळते कविता माझी
अस्तित्व माझं जपते कविता माझी
शुन्य होतो मी..... जेव्हा लपते कविता माझी
मनात अशी दाटते कविता माझी
अलगद शब्दांत साठते कविता माझी
मनातले ओठी आणजे कविता माझी
भेद मनातले सारे जाणते कविता माझी
बनुन श्वास तनामनात भिनते कविता माझी
शब्दसखा मी...सखी वाटते कविता माझी
सात रंगात आज नहाले प्रेम तुझे...
नितळ, निर्व्याज जाहले प्रेम तुझे..
शब्दात माझिया या साठले प्रेम तुझे...
सुरांनी माझिया या गायीले प्रेम तुझे...
श्वास माझा प्रत्येक जगतो प्रेम तुझे...
क्षण माझा हर एक जिंकतो प्रेम तुझे
फक्त तू नकोस मला
साथही तुझी हवी आहे
शांत स्थळी एकांतवेळी
प्रीत तुझी हवी आहे..


शृंगार प्रेम नको मला
वात्सल्य प्रेम हव आहे
सांजवेळी सूर्यास्ताला
प्रेमगीत हव आहे

दवबिंदू नकोत मला
रिमझिम पाऊस हवा आहे
रानफुलाला सुखावणारा
गार वारा हवा आहे

फक्त शब्द नकोत मला
अर्थ त्यातला हवा आहे
तिमिरातून तेजाकडचा
मार्ग त्यातून हवा आहे

सृष्टी सारी नको मला
द्रुष्टी तुझी हवी आहे
तुझ्या डोळ्यात दिसणारा
विश्वास मला हवा आहे

तुझा दुरावा नको मला
सहवास तुझा हवा आहे
खचनाऱ्या माझ्या मनाला
आधार तुझा हवा आहे

क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तू हवी आहेस
वेळ तुझी नको मला
वेळीस तू हवी आहेस
प्रेम करावं पॄथ्विसारखं
सुर्याभोवतीच घुट्मळत राहणारं
ग्रहणे जरी लागली सुर्याला
तरी त्यांनाही माफ़ करणारं

प्रेम करावं पानांसारखं
फ़ांदीवरच खिदळत राहणारं
झाली जरी पड्झड तरी
पुन्हा फ़ांदीवरच येणारं

प्रेम करावं माशासारखं
पाण्याशीच एकरुप होणारं
झाला जर विरह तर
जीवनालाच झोकुन देणारं

प्रेम करावं मुळांसारखं
मातीलाच धरुन राहणारं
अनेक वादळं आली तरी
तिच्यातलं सत्वच शोधणारं

तुझे माझे अचानक भेटणे
की एकमेकांच्या नजरेत हरवून जाणे..
माझे हळूवार लाजणे
की तुझे गडबडून जाणे..
माझे शांत गाणे,
की तुझे शब्द जोडणे..
माझे छान दिसणे,
की तुझे आकर्षक असणे..
माझे चंचल मन,
की तुझे संथ हृदय..
माझे हलकेच हसणे,
की तुझे माझ्यात गुंतणे..
तुझे स्पर्श करणे,
की माझे मोहरून जाणे..
दूर असताना मला तुझी आठवण येणे,
की माझे नेहमीच तुझ्या सोबत असणे..
तुझे मला चिडवणे,
की माझे उगाच रागवणे..
तू दुसरीला बघितल्यावर माझे जळणे,
की माझे दुस-याशी बोलणेही तुला सहन न होणे..
भेटल्यावर तुला वेळेचे भान नसणे,
की मला लवकर घरी जाण्याची ओढ लागणे..
भांडण झाल्यावर माझे उदास होणे,
की तुझे सतत बेचैन असणे..
आपण कधी मित्रमैत्रिण असणे,
की कधी त्याहून जास्त काहीतरी वाटणे..
हे खरोखर प्रेम आहे ,

Monday, September 10, 2012

प्रेम
प्रेम म्हणजे आंब्याच लोणचं
ओठावर घेताच .
झाकलेल्या.डोळ्यातूनच सर्व भावना कळतात..

प्रेम म्हणजे मिरची चा ठेसा..
...
जिभेला चिटकताच
भिजलेल्या डोळ्यातूनच सर्व भावना कळतात..

प्रेम म्हणजे गुलाबजामून..चा पाक..
तोंडात घेताच..
फुललेल्या गालातूनच सर्व भावना कळतात..

प्रेम म्हणजे थंडगार बर्फ..
जीभेमध्ये पकडताच..
मिटलेल्या डोळ्यांनीच साऱ्या भावना कळतात..

प्रेम म्हणजे..गरम चहा..
सुर्र्र कून येनारया आवाजातूनच साऱ्या भावना कळतात..

अश्या प्रेमाच्या खूप व्याख्या आहेत..
ज्या कि फक्त भावना व्यक्त करतात..
पण ज्याला त्या भवना फक्त ईशारयातूनच कळतात..
त्याला खर प्रेम म्हणतात....
गंध तुझा
तुझ्या येण्याने आयुष्यात माझ्या
जाई जुई बहरल्या
गंधहीन आयुष्य माझे
जणू
सुगंध पुन्हा एकदा बहरला
...

श्वासात मिळवूनी श्वास
ओठांवर स्पर्श तुझा
मोहरली सारी काया
वाटले मला
मोगरा पुन्हा एकदा खुलला

मोकळ्या केसात माझ्या
जेव्हा
श्वास तुझा अडकला
अमावस्येच्या रात्री
राजा
चांदण्या पुन्हा एकदा खुलल्या


तुमच्यासाठी काय पण
तो आणि तू ......
उन्हात रिमझिम बरसणारा तो
त्याच्यात भिजणारी तू,
तूझी गडबड त्या इंद्रधानुसाठी
अन माझी तुला न्याहाळण्यासाठी...

...
कधी कधी प्रश्न पडतो
तू जास्त सुंदर आहेस कि
तुला अधिक सुंदर बनवणारा तो

कधी कधी प्रश्न पडतो
ते इंद्रधनुष्य अधिक मोहक आहे कि
कि तुझं ते निखळ सौंदर्य

कधी कधी प्रश्न पडतो
कडाडणारी वीज अधिक मादक आहे कि
तुझं ते लाजून मुद्दाम हसणं
काही शब्ध असतात कि जे नेहमी ऐकावेसे वाटतात......
काही नाती एवढी गोड असतात कि ती कधीच संपुच नयेत असे वाटते.......
आणि काही माणस असतात,.......तुझ्यासारखी कि ती नेहमीच आपलीच असावीत अस वाटत ....................अगदी जीवनाच्या शेवट पर्यंत.

आपल कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचे असण्यात आनंद आहे
चार दिवास झिजण्यापेक्षा
एका दिवसाच्या जीवनचा अर्थ आहे
वादळातून चालण्यापेक्षा वादळात
मोहेन पडण्यात समर्पण आहे
कठावरून डोकावण्यापेक्षा
पुरामध्ये झोकून देण्यात जीवन् आहे
कोणी आपल्यासाठी झुरण्यापेक्षा
...
आपण कुणासाठीतरी झुरण्यात प्रीत आहे,
आपल कोणीतरी असण्यापेक्षा
आपण कोणाचेतरी असण्यात आनंद आहे
वाट चालली, तसा चालतो कधी कधी
हवा वाहिली, तसा लहरतो कधी कधी

मला जवळचा मित्र मानती किती तरी
तरी एकट्याने मी रडतो कधी कधी

धडपडलो अन सावरलो मी अनेकदा
हार मानली तरी जिंकतो कधी कधी

...
तू सागर मी तुझा किनारा निवांतसा
तुझा असुनही तुझाच नसतो कधी कधी

मला सुखी करण्याकरिता झटतेस खरी
तरी तुला मी दु:खी करतो कधी कधी

नकळत होते तुझ्यामुळे संपूर्ण गझल
अथवा मी काफियात चुकतो कधी कधी
असं फक्त प्रेम असंत
त्याला हृदयातचं जपायचं असतं
आभाळाइतकं विशाल, अणूरेणूइतकं सूक्ष्म
स्वैर विहार करणारं, बन्दिवान करणारं
सुखाचा महासागर, दुःखाचा डोंगर
हास्याचा फुलोरा, कोसळणारा अश्रुंचा मनोरा
फुलपाखरासारखं चंचल, दगडासारखं अचल
कधी शहाणपणाचं, कधी मुर्खपणाचं
वाट बघायला लावणारं, कधी मुर्खपणाचं
...
निःस्वर्थी त्यागी, नाहीतर स्वार्थी भोगी
प्रेमात अधिकार असतो
पण गाजवायचा नसतो
प्रेमात गुलाम असतो
पण राबवायचा नसतो
प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं
पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं
नेहमीच एकट्याचं असतं
पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं
कळत नकळत कसं होतं
ते मात्र कधीच कळत नसतं
... असं फक्त प्रेमच असतं
जे आई बाबांसारख असत
जे आपल्यावर खरे करतात असे करायचं असत आगदी मनापासून
प्रेमात असं थांबायच नसतं,
मागे न वळता पुढेच चालायच असतं..
ऎकमेकांची साथ घेऊन
जग जिंकायचं असतं

दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे
यात फरक एवढाच,
की दुखणार्या मनाला आवर घालता येत नाही ,
...

आणि गुलाबाला तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही......

भावना ओंजळीत घेउन नको जगुस
त्या व्यक्त करन्यात मजा आहे...
डोळ्यात अश्रु नेहमीच येतात,
ते पुसुन हसन्यात मजा आहे..,,,,,,,
पटकन एक ओळ सुचावी,
जेव्हा ती मला पहिल्यांदा दिसावी...
मी सगळं विसरून फक्त तिलाच पाहावं,
अन माझ मलाच भान नसाव..
पटकन एक ओळ सुचावी,
जेव्हा ती माझी अर्धांगिनी व्हावी...
आयुष्याची गाठ अन विश्वासाची जोड,
आमच्या नात्याला सदेव्य असावी...

पटकन एक ओळ सुचावी,
...
जेव्हा त्याच सुरेल दिवसांची आठवण,
माझ्याच नकळत मला यावी ...
मग मला ती,
आठवणींच्या विश्वात,
दूर कुठे तरी घेऊन जावी...

मग..
ह्याच सार्या सुचलेल्या ओळींची,
मी एक कविता लिहावी...
आणि तिच कविता तिला ऐकवावी...
त्या कवितेत असेल,
ती त्या सुरेल क्षणांची साठवण...

अन त्याच साठवनिनी रचलेली हि कविता ऐकून,
ती लहान बाळासारखी खुदकन हसावी..
ती लहान बाळासारखी...
खुदकन हसावी..
तुझ्यासाठी काही पण
असे सारेच बोलतात
पण मी तसे बोलणार नाही
चंद्र तारे तोडून आणीन
अशी भाषा कधी
मी वापरणार नाही
इतकच म्हणेन मी
तुझ्या सुखाशिवाय मनात
काहीच असणार नाही
...

तुझ्या वेदना ओंजळीत घेईन
दुखातही तुझी साथ
कधी सोडणार नाही
प्रेमासाठी काही पण
हे तुला दाखवल्याशिवाय
मी रहाणार नाही
तुझ्यावर इतकं केलय प्रेम
कि माझ्यावरही कधी
इतकं प्रेम मी केलं नाही...