NiKi

NiKi

Friday, March 2, 2012

तुझ्या आठवणी...
तुझ्या आठवणी चांदण्या रातीत
वाऱ्याच्या झुळूक होऊन येतात
अन माझ्या शरीराला
हळुवार स्पर्शुनी जातात!१!

देतात मज श्रवणीय गुज
तुझ्या अस्तित्वाची
अन साद देतेय रात्र
तुझ्या माझ्या प्रीतीची!२!

प्रीतीच्या थंडीत आज मन
जास्तच कुडकुडतय
तेवढ जास्तच आज तुझ्या
मिठीत यावस वाटतंय!३!

मिठी माझी पाहून
चंद्राची कोर झाली
अन रात्रीने काजळ लावताच
तुझ्या गालावर खळी पडली!४!

तुझ्या अजाणत्या खळीत
स्वताला हरवावसं वाटतंय
अन विखुरलेल्या केसांच्या बटात
स्वताला गुंतवावसं वाटतंय!५!

हरपिलो भान मी
तुझेही डोळे बंद
जणू मोहरूनी गेला
इथला सगळा आसमंद!६!

तळपली वीज तारुण्याची
क्षणार्धात कोसळली
दोन जीवाला एकजीव
करूनच शांत झाली!७!

No comments:

Post a Comment