बंद खोलीत सुद्धा
सुगंध येतोच त्याचा
माती आणि थेंबाच्या
मधुर मिलनाचा
जसे किती वर्ष उलटले
कवेत घेऊन
घट्ट मिठी मारुन
झळ झळ वाहात जातो
तो वेडा प्रेमी पाउस
हिरव्याकंच पानांच्या झालरीवर
लाल टपोरया फुलांच्या परागी
फांद्याच्या रस्त्यावरुन
काटयांच्या वस्त्यांमधून
झर झर धावणारा
हळूवार ओघळनारा स्पर्श
हृदयाच्या मुळाशी वसनारा
नवजीवन पल्लवितो
तो वेडा प्रेमी पाउस
खिडकीच्या काचेवरुन
नदी सारखी वाट काढत
ओघळनार्या धारा
नागमोडी आयुषाची
धूळ साफ करत
बंद पुस्तकातल्या
हज़ारो स्मृति उधळत
एक थेंब हळूच
हातावर सोडून
धो धो वाहणार्या पावसास मिळतात
दर वेळी नवीन
आठवण घेऊन जातो
तो वेडा प्रेमी पाउस………
No comments:
Post a Comment