NiKi

NiKi

Wednesday, March 7, 2012



मन पावसात चिंब न्हाले..
मन गारव्यात धुंद झाले..
पावसात, गारव्यात मन
आठवात गुंग झाले.ही सरसरती सर ओली..
आभाळाला तुच दिली..
ती झेलताना, पेलताना
उरातुनी वीज गेली..
लख्खलख्ख चमकुनी मन
ओंजळीत बंद झाले.
मन पावसात चिंब न्हाले..

हा दरवळता ऋतु गार..
वा-यावरी नशा स्वार..
सळसळता अन छळता
फ़ुलांवरी झाला वार ..
श्वास दग्ध घेऊनी मन
पाकळीत गंध झाले
मन पावसात चिंब न्हाले..

सये अंगणात सुर येई..
तो वा-यासवे दुर जाई..
गुणगुणतो, ऋणझुणतो
हिरवा रानी पुर वाही..
पानावरी झरुनी मन
थरथरता थेंब झाले.
मन पावसात चिंब न्हाले..
मन गारव्यात धुंद झाले

No comments:

Post a Comment