NiKi

NiKi

Wednesday, September 25, 2013

रात्री झोपताना नेहमी मी चंद्राकडे पाहतो
स्मित हास्य करीत तो विचारतो
बाळा आज हि झोप येत नाही का ?
नाही म्हणून...
काय करतोय रे माझ बाळ ?
मी त्यालाच विचारतो ♥♥
तुझ्या रूपापुढे काय तो चंद्र काय ते तारे...
कस्पटा समान दिलखेच नज़ारे सारे...

तुलना तुझी कधी ना होणार कुणाशी....
तृण समान ती रम्भा आणि ती उर्वशी...?

नयनी तुझ्या खोली सागराची...
घडविते सफ़र मज ह्या विश्वाची..

तुझ्या केसांपुढे वर्षामेघ ही फिका..
केसांच्या छायेत आल्हाद गोजरा ...

तुझ्या चाली पुढे वरमतो मयूर...
घायल हजारो परि तुझा ना कसूर...

स्वर तुझा जणू काही आठवा सुर...
वाणी तुझी मधुरा पेक्षा ही मधुर..

स्पर्श तुझा मातेच्या चरण परि...
नसेल तसा आनंद ह्या धरे वरी...

जगी स्वप्नांच्या हरविले हे मन...
तुला पाहण्याकरीता तरसले हे नयन...

धुंद राती येते तुझी आठवण खुप...
आठवते मज तुझ्या प्रेमाची उब...

ये प्रिये नको अंत पाहुस ह्या जिवाचा...
प्रतिसाद हवाय मज तुझ्या प्रेमाचा...
तू

गौरगुलाबी चर्येवर
लालकेसरी टिकली टेकलेली...

लालचुटुक ओठांत
गडद गुलाबी गुपिते मिटलेली....

लालगुलाबी वस्त्रांत
सौम्य गुलाबी कांती लपेटलेली...

मंद गुलाबी गंधाची
एक देहकुपी लवंडलेली...

सभोवताल्यांशी राखलेलं
एक फिकटं गुलाबी अंतर...

तू ?... छे! ... तू नव्हेसचं तू;
तू तर गुलाबच्या फुलाचे भाषांतर !!
दिस नकळत जाई ,सांज रेंगाळून राही
क्षण एकही ना ज्याला तुझी आठवण नाही

भेट तुझी ती पहिली लाख -लाख आठवतो
रूप तुझे ते धुक्याचे कण-कण साठवतो
... वेड सखी साजणी हे मज वेडावून जाई

असा भरून ये उर जसा वळीव भरावा
अशी हुरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या मग भिजुनिया जाई
आता अबोध मनाची अनाकलनीय भाषा
जशा गूढ -गुढ माझ्या तळहातांवर रेषा
असे आभाळ -आभाळ रोज पसरून राही

मनाच्या डोहात खोल खोल तुझ्या आठवणी…
रानातून वाहता ओहोळ तुझ्या आठवणी…

फ़ेर धरतात चांदण्यात तुझ्या आठवणी…
सावली धरतात उन्हात तुझ्या आठवणी…
... ...
स्वप्नामधला वावर तुझ्या आठवणी…
मोरपीस जसे अंगावर तुझ्या आठवणी…

तुझ्याइतक्याच हळव्या तुझ्या आठवणी…
राहून राहून छळव्या तुझ्या आठवणी…

करतात भावविव्हल तुझ्या आठवणी…
तरीही राहू देत जवळ तुझ्या आठवणी…

माझ्या प्रीतीचं इमान, तुझ्या आठवणी…
तू नाहीस… किमान तुझ्या आठवणी…!
मी पुन्हा भेटेन ....
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना

मीपुन्हा भेटेन ...
... ... .त्याच बेधुंद वाऱ्यासोबत
काळाशी स्पर्धा करताना

मीपुन्हा भेटेन ....
त्याच बेफान लाटांसोबत
आकाशाला गवसणी घालताना

मीपुन्हा भेटेन ....
त्याच हसणाऱ्या फुलांसोबत
आनंदाचे साम्राज्य पसरवताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच तळपणाऱ्या सूर्यासोबत
नव्याने तेजस्वी होताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच हळव्या आठवणींमधून
नकळत तुझ्या डोळ्यांतून बरसताना.
कसं रे सांगु तुला
मी तुझाच विचार करते,
धुंद तुझ्या मिठीत
मी स्वत:लाच हरवते.

बोलणे तुझे ते मधाळ
मी माझा राग ही विसरते,
बाहुपाशात मग तुझ्याच
अश्रुनां मोकळी वाट मिळते.

सांत्वन करता करता तू
मला स्वंत:मध्ये गुंतवतोस,
नकळत मग माझ्या
देहाशी खेळत बसतोस.

जादू तुझ्या स्पर्शातील
अशी माझ्यावर चालवतोस,
करुन मनाला बेधुंद
अवधे विश्वच माझे व्यापतोस.

नसतो तुझ्याशिवाय मला
दुसरा कसलाच ध्यास,
सांग ना रे तुच, का होतात?
क्षणोक्षणी आठवण येते अन जाते
या आठवणिला तरी काही कळते
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप् रमाणे गळते
तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते....





स्मरली ती भेट
अन चुकली स्पंदने
हरवलेल्या नजरा
अन ओठांची कंपने
हातातला हात
अन तुझे ते लाजणे.
तोंडावर राग
अन मनातले हसणे.




प्रेम खुप सुंदर आहे...
अगदी तिझ्या सारखं...
प्रेम हे एकदाच होतं...
जसं ह्रदय या शरीरात एकच...
जसा धरतीला चंद्र एकच...
अन् तिझ्या सारखी ती एकच...
खर तर प्रेमं खुप नाजुक असतं...
फुलांच्या पाकळ्यांना त्यांच्या
रंगाचा हि भार वाटेल एवढं नाजुक...
प्रेमात एकमेकांच्या भावनांना
जपता आलं पाहिजे...
प्रेमाच्या फुलाला विश्वासाचा गंध पाहिजे...
जेव्हा दोघांमधील दुरावा एकांत देऊ लागला...
तेव्हाच तर तिच्या आठवणींना उजाळा येऊ लागला...
प्रत्येक गोष्टीला वाईटपना जोडलेला असतो...
आपन फक्त चांगल तेवढ घ्यायचं...
वाईट असेल ते बाजुला सारायचं...
प्रेम हे खुप गोड आहे...
खुप सुंदर आहे...
प्रेम म्हणजे नक्की काय...?
मनाला जेव्हा हे कळायला लागतं...
कोणीहि न सांगता...
तेव्हा डोळ्यातलं पाणी
आपोआप पुसलं जातं...
प्रेम म्हणचे प्रेम असतं.... की ?
दुसरं वेगळं काय ?
हे तेव्हा नक्की कळतं...!
(एक विचार करनारा कजवाच समजा.)
जर मी तुझी वाट पहात
बसलो आहे तर ह्याचा अर्थ
असा नाही कि माझ्याकडे
काहीच काम नाहीये, .............
ह्याचा अर्थ असा कि
.
.
.
.
.
.
.
.
ह्याचा अर्थ असा कि माझं
कोणतेही काम
तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये .

Thursday, September 19, 2013

"तू अबोल होऊन जवळ घ्यावे
मी भान विसरून धुंद चांदणे व्हावे


आठवणीत तुझ्या हे अश्रू वाहत रहावे

आणि खुशीतच तुझ्या हे सुंदर आयुष्य संपून जावे " —




"प्रीतीत तुझ्या स्वतःला हरवून जाण्याची, मजा काही औरच आहे,

विसरतो मी, 'मीपण' माझे, तुझ्या नजरेची जादू काही औरच आहे,

किती समजावु मी वेड्या मनाला माझ्या,

जगावेसे वाटतात ते क्षण पुन्हा पुन्हा तुझ्याचसोबत,

तुझ्या त्या प्रत्येक हळुवार स्पर्शातली, ती नशा काही औरच आहे…"




तुझे डोळे... ते जरा किंचितसे ओले
लपवलेल्या थेंबामागून... ना जाणे किती बोले

तुझे डोळे... नेहमीच एक कोड्यासारखे
कधी खूप सांगणारे... कधी एकदम शांत रहस्याचे

तुझे डोळे... हसता हसता भरून येणारे
दूर कुठेतरी....मला सोबत नेणारे

तुझे डोळे.... कधी त्यात तडजोड दिसते मला
त्यात नेहमीच 'मी' अन् कधीतरीच 'तू' दिसते मला

उद्या कुणी पाहिलाय? ना 'मी' ना 'तू'
पण आठवतील... तेच डोळे... नेहमी मला ओळखणारे

'कुणाला तरी आपण हवं असणं, खूप खूप हवं असणं' हे आपल्याला नेहमीच सुखावतं ना?
हेच मला तुझ्या त्या डोळ्यांत दिसतं....म्हणून ते मला हवे हवेसे वाटतात.
तेच डोळे.....कुठल्या तरी खोल विचारात बुडालेले.

मी ओळखू शकलो का तुला? चुकलो ही असेन कित्येकदा
माफ हि केले असशील कित्येकदा... माझ्या नकळत... मला चूक समजूनही न देता
तुझ्या प्रत्येक कटाक्षाने मला आठवणी दिल्यात... तुझ्या नकळत... तुला समजूनही न देता
तान्ह्या बाळासारखं...निरागस हसणं तुझं...
नकळत मनात....अलगद बसणं तुझं....
केसांची एक लट...हळूच कानामागे घेणं तुझं...
नसताना लक्ष माझं...हळूच लक्ष देणं तुझं....

नजरेशी माझ्या...नजरेनीच बोलणं तुझं....
ऊनाड वाऱ्यासंगे...वारा होऊन डोलणं तुझं....
गालावर नाही खळी...तरी नक्षत्र रूप तुझं....
मनातली परी तू....दुर्मिळ हे सगळं...जप तुझं...

ना तू फुलाइतकी सुंदर...
पण त्याहून सोज्वळ असणं तुझं....
श्वासाहून झालीस गरजेची तू....
क्षणोक्षणी जाणवतं...नसणं तुझं...
या आभाळाने, या लाटांनी आमची प्रत्येक स्वप्नं ऐकली आहेत.
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं की, मनाला जे समाधान मिळतं ते फक्त मला अन या आभाळाला जाणवतं.
तू ही परकाच या रे जाणीवेपासून.
माझ्या बंद डोळ्यांमागे मी जे काही पाहिलं, तेव्हा तिथेही हे आभाळ होतंच.

तू सोबत असताना नक्की काय वाटतं, हे शब्दात सांगू!! इतकी मोठी परीक्षा नको रे शब्दांची.
दूरदूर नजर टाकूनही आभाळ काही नजरेत मावत नाही.
मला तुझ्यासोबत त्या आभाळाच्या टोकापर्यंत जायचंय. पहायचंय कुठं संपतं ते.
ते थकेलच ना कुठेतरी? पण आपण चालत राहू... दोघे... एकमेकांसोबत

तुला लक्षात राहील ना? हे आपलं भेटणं, हा किनारा आणि... मी.
मी पण लक्षात नाही रे ठेवणार. पण... विसरता नाही येणार.
कारण नको विचारूस कधी.
एखादी गोष्ट लक्षात राहण्याची किंवा मुद्दाम लक्षात ठेवण्याची ज्याची त्याची कारणं वेगवेगळी असतात
चल जावूया कुठे तरी लांब...शांत...जिथे कुणी नसेल. आभाळ असेल अन् तुझ्या मिठीत मी असेन.
शब्दही मोजकेच असतील पण, तरीही बोलणं खूप असेल. बोलणं तेही डोळ्याने, श्वासाने, स्पर्शाने.
खूप दिवस मनात जे काही ठेवलंय ना, ते सगळं बोलू. इतर वेळी ऐकत नाही तर आता तरी ऐकू.
स्वतःला विसरून एकमेकांतल्या स्वतःला भेटू. मलाही बघायचंय कशी आहे तुझ्या मनातली माझी सावली, माझी आकृती.
मनातल्या मनात खूप बोलत असशील ना माझ्याशी? पण माझ्या कानी पडत ते? आज तुझ्या मनात जाऊन ऐकू दे ते सगळं.
समोरच्या लाटा जवळ येतील तेव्हा थोडासा श्वास वाढेल माझा, ठोके वाढतील हृदयाचे पण, तू जवळच असशील ना माझ्या?
मग तुला नक्की जाणवतील ते? तू हात घट्ट धरशील मग तेव्हा माझा आणि धीर देशील की, "आहे मी तुझ्यासोबत. घाबरू नकोस."
जे काही बोलता नाही आलं या आधी, ते बोलताना थोडं पाणी येईल माझ्या डोळ्यांत...पण तू असशील ना ते पुसायला.
मग वाहू दे त्यांना.

समुद्राचं पाणी ही खारं आणि डोळ्यांतलं ही.
पण समुद्राचं पाणी किती ही अफाट असलं, तरी डोळ्यांतलं इवलसं खारं पाणी त्याहून जास्त वाहून नेतं... आपल्यालाही आणि समोरच्यालाही.

प्रश्न तुझ्याही मनात खूप असतील...जसे माझ्या मनात आहेत. तुलाही उत्तरं हवी असतील...जशी मला हवी आहेत.
या प्रश्नाच्या जाळ्यातच खूप दिवस गेले आहेत...तुझेही आणि माझेही... आणि हाती फक्त मनस्ताप आलाय... तुझ्याही आणि माझ्याही.
आज देवू या ना रे उत्तरं... एकमेकांना... एकमेकांच्या प्रश्नांची....
काही उत्तरं पटतील....काही अडतील....
जी पटतील....ती तशीच ठेव जपून....अन् जी अडतील....ती समवजून सांग...आपण ती मिळून सोडवूया....

हात सोडण्यापेक्षा प्रश्न सोडवलेले बरे ना...?
कारण......
माझं 'सगळं' तुझ्यापासून सुरु होतं...अन् तुझ्यावरच येवून संपतं.
तू मला... मी तुला....
गुणगुणू लागलो...
पांघरू लागलो...
सावरू लागलो....
नाही कळले कधी....
नाही कळले कधी....

नाही कळले कधी.. जीव वेडावला
ओळखू लागलो.. तू मला मी तुला
नाही कळले कधी....
धुंद हुरहूर हि.. श्वास गंधाळला
ओळखू लागलो.. तू मला मी तुला
नाही कळले कधी....

तू मला... मी तुला....
गुणगुणू लागलो...
पांघरू लागलो...
सावरू लागलो...

तू कळी कोवळी.. साजिरी गोजिरी
चिंब ओल्या सरी.. घेत अंगावरी
स्वप्न भासे खरे.. स्पर्श होता खुला
ओळखू लागलो.. तू मला मी तुला
धुंद हुरहूर हि.. श्वास गंधाळला
ओळखू लागलो.. तू मला मी तुला
नाही कळले कधी....

शब्द झाले मुके.. बोलती पैजणे
बदलले काही या.. सोबती चांदणे
पाहताना तुला.. चंद्र हि लाजला
ओळखू लागलो.. तू मला मी तुला
नाही कळले कधी.. जीव वेडावला
ओळखू लागलो.. तू मला मी तुला
नाही कळले कधी....

तू मला... मी तुला....
गुणगुणू लागलो...
पांघरू लागलो...
सावरू लागलो....

तू मला... मी तुला....
गुणगुणू लागलो...
पांघरू लागलो...
सावरू लागलो....

नाही कळले कधी....
जगातलं एकही माणूस आपल्याला आजवर आवडलं नाही असं म्हणताच येत नाही.
नुकत्याच जन्माला आलेल्या तान्ह्या बाळाचंही कोण ना कोण तरी आवडतं माणूस असतं, ज्याला पाहून ते आपसूकच हसतं.
कुणीतरी मनात आवडतं असतंच. खोटं का बोलावं? पण आवडीला मनात दडवून ठेवलं जातं.
कधी स्वाभिमानाच्या नावाखाली जपलेला इगो तर कधी स्वत:वरचा अविश्वास मध्ये येतो.
त्या व्यक्तीच्या खूप जवळ रहावंसं वाटत असतं. सगळं सांगावंसं वाटत असतं.
पण का? माहित नाही.
प्रत्येक 'का?' चं कारण सहज मिळवून दिलं, तर ती नियती कसली?

आपली आवडणारी माणसं कधी कधी नियती आपल्याला मिळवून देते.
पण घास अगदी तोंडापर्यंत भरवायला नियती काही आई नाही ना?
नियती ताट भरते, घास नाही भरवत. स्वत:चे घास स्वत:च भरवून घ्यायचे असतात.

नियतीने मिळवून दिलेल्या माणसांना आपलं करण्यासाठी कधीकधी राजकारण खेळावं लागतं.
मनालाही कधीकधी बुद्धीची गरज भासते आणि तेव्हा ती नक्की घ्यावी.

आपल्याच माणसांना मुद्दाम टाळावं लागतं, कारण...
कधीकधी अंतर कमी करण्यासाठी अंतर ठेवणं गरजेचं असतं.

Friday, September 13, 2013

तू ..... निखळ हसणारी एक चांदणी,
अन मी बावरलेला एक चंद्र ....
तू पावसाच्या पहिल्या सरीचा थेंब,
अन मी त्या थेंबातले प्रतिबिंब ....
तू ....सोनेरी संध्याकाळ काहुरलेली,
अन मी तुझ्यात बुडणारा सूर्य हुरहुरलेला....
तू एक लाट किना-याजवळ घुटमळणारी,
अन मी किनारा तुला अडवू पाहणारा ...
तू .... सावली उन्हामधली मला बिलगून
चालणारी
अन मी एक उनाड ढग तुला लपवणारा
तू एक मोरपीस मोहरलेले अन
मी पुस्तकाचे पान तुला आयुष्यभर जपणारा
तू .... एक वेल प्राजक्त फुलांची
अन मी त्याभोवतीचा बेधुंद सडा
तू पावसाची एक वेडी सर ...
अन मी त्यात भिजणारा पाउसवेडा
"जर आधीच माहिती असतं,
कि ती मला स्वप्ना मध्ये भेटायला येणार
आहे....
तर देवाशप्पथ ....
डोळ्यांवर गुलाबाच्या पाकळ्यांना सजवून
झोपलो असतो !!!
"नातं आपलं कप आणि बशीचं..
कपानं सांडलं तर बशीनं साठवायचं..
रात्रीच्या गोष्टींना सकाळी गुपचूप आठवायचं..

आठवता आठवता हळूच गालात हसायचं..

नातं आपलं चहा अन् दुधाचं..
दुधाबरोबर चहानं आनंदानं उकळायचं..

कधी रुसायचं, कधी हसायचं,
पण शेवटी एकमेकांच्या मिठीतच विसावायचं..

नातं आपलं हळव्या प्रेमाचं..
एकाला लागलं कि दुसऱ्यानं कळवळायचं..

एकाच्या कर्तृत्वाला दुसऱ्यानं नावाजायचं..

एकाच्या सुखदुःखात दुसऱ्यानं
स्वतःला हरवायचं..

नातं आपलं साता जन्माचं,
सख्या का रे अस्वस्थ व्हायचं..

कधी गुरगुरायचं,कधी गोंजारायचं..
पण आपण सदैव बरोबरच रहायचं.."

माझी न मी राहिले
दिसताच तू मला
विसरले मी मला
स्वप्नातल्या त्या
रात्री अजून ओल्या
कंप हा असा
गोड शहारा
जीव आसुसला
तव स्पर्श होण्या मला
अवचित काय झाले
माझे मला न कळले
जेव्हा कळून आले
होते तुझी मी झाले...




तुझ्या डोळ्यातलं टिपूर चांदण
माझ्या मनास वेड लावत
तुझं ते चोरून बघणं
माझं ऊर खाली वर करतं
तुझं ते लाजून हसणं
माझ्या काळजात घर करतं
तुझी ती नजर झुकवणं
माझ्या मनास खूप आवडतं
तुझं ते अबोल राहणं
माझ्या मनात प्रीत फुलवतं
तुझ्या नजरेन मला खुणावण
तुझा गुलाम करून टाकत
तुझ्या मनातही आहे प्रीत
माझ्या मनास कळून जातं
जेव्हा तुझ्या नजरेतल प्रेम
माझ्या नजरेला कळून जातं
जगाची ही दुनियादारी...
अनं प्रितीची धडधड भारी...
.
.
टिकटिकही वाजेल डोक्यात मग...
जेँव्हा वेडं मन आठवणीच्या धुक्यात असेल...
अनं अनामिक ओढीचं गुढ स्वप्न...
जेंव्हा दोघांच्या अंतरी वसेल...
.
.
वाढतील मग नजरेतील...
प्रेमळ ते ध्यास...
अनं हरवलेल्या धुंद मनाचे...
ते गहिरे आभास...
.
.
ओझरते संपणारे ते अंतर...
अन स्पंदनालाही ना ऊरते जेव्हा गत्यंतर...
पेटणारी ती ओढीची चिंगारी...
जळत राहते मग निरंतर...
.
.
उधाणलेल्या या मनासवेँ...
वाटे करावी खटपट सारी...
अलवार त्या प्रितीसाठी पुन्हा एकदा...
वाटे करावी आता दुनियादारी...
.
.
अलवार स्पर्शाची चाहुल...
अन अडखळणारे ते पाऊल...
का ते डोळे मग वळुनी पाहे...
प्रितीच्या या धुक्यात मग सारेच मनाला साहे..
रुळावे तुझे दाट केस गाली
क्षितीज भेटण्याचा भास व्हावा
अन त्या गालावरती
चंद्राचा प्रकाश सारा रिता व्हावा .....
पापण्यामध्ये तुझ्या
पाउसही जरासा अडावा
क्षणभर घेऊन तिथे विश्रांती
मनभरून तो मग पडावा ....
तळहाती तुझ्या मेंदीचा रंग असा
इंद्रधनुही क्षणभर घुटमळावा
स्पर्शात तुझ्या गोडवा असा
रंगही त्यात जसा विरघळावा....
चाहूल तुझ्या येण्याची अशी
जीव माझा झुरावा
तू जाताना माघारी
पाउसही माझ्यासवे मागे एकटा उरावा....
असे बंध जुळावे तुझे माझ्याशी
तुझा नि माझा श्वास जणू एक व्हावा....
स्पर्श होता तुझ्या गंधाचा
मनी मोर नाचतो
रोम रोम बहरून
श्वासात तुला भेटतो
तू अशीच वहाते माझ्यात
माझ्याही नकळत
दूर असूनही तुझा
स्पर्श मी अनुभवतो
तुझे असे असणे
हृदयी फुलवी चांदणे
मोगरा माझ्या प्रेमाचा
मनी फुललेला असतो
हि प्रीत वेडी प्रिये
तुझ्यासाठीच जगतो
मजलाही ठाव नाही
मी माझा किती उरतो .
-------------------------

Wednesday, September 4, 2013

माझ्या स्वप्ना मधे सूद्धा
एक सूंदर परी असते
ति स्वप्न रंगवून माझे
मला स्वप्ना मधे छऴीत असते

.
.
तिच्या तिरकस भूवयांच्या मधे
तिने एक गंध लावलेले असते
तिला शोभून दिसनारे ते गंध
जणू तिच्या साठीच बनलेले असते
.
.

कोमल काना वरून तिच्या
रांगेत केसांची गर्दी जात असते
अन् झूऴूक आली हवेची एक, की
ती चेहरयावरच येवून बसत असते
.
.

गोड गालावर पडणारी खऴी
हि तिला खूपच शोभून दिसते
जणू संथ पाण्या मधे
ति एक भोवरा बणून खूदू खूदू हसते

.
.
तिच्या निरागस चेहरयावर
तिची बारीक नथ ईतकी शोभून दिसते
जणू चंचल चंद्राच्या सोबतीला
ति चांदणीच शोभून दिसते

.
.
तिच्या शूभ्र ओठांवर
गूलाबी लाली शोभून दिसते
जणू गूलाबी कोमल फूलाला
त्या पांढरी पाकऴी शोभून दिसते

.
.
चंचल चालण्या मधे तिच्या
एक वेगऴीच अदा असते
जणू चालणारया पायांनी
ती जमीन च निर्मळ होत असते

.
.
मोरपंखी साडी नेसून माझी परी
ईतकी अप्रतिम ती दिसत असते
कि हि
माझ्या स्वप्ना मधील परी
हि फक्त माझ्या साठीच बनलेली असते


रोज मला नकळत,

खूप खूप छळते ती.....

तरी मी तिला,

काही बोलत नाही.....

कारण ???

मला स्वप्नात येऊन,

सतवत असते ती.....

या व्यतीरीक्त ती,

कुठेच भेटत नाही.....

तरी हि मी नेहमी,

दु:ख न करता खुश राहतो.....

कारण ???

स्वप्नात का असेना,

माझ्या जवळ तर असते ती.....

माझ्या जवळ तर असते ती.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)
पाखरू वेडे मन असे,
शोधीत फिरे तुलाच राणी ....
कधी आर्त साद घाली,
कधी तुझीच गाई गाणी ....

शांत शांत सूर हे नवे,
तुझेच ऐकू येती राणी ....
कधी सुरांची मैफल सजे,
कधी गुणगुण तुझीच कानी ...

दूर दूर नभ एक वेडा,
रूप दाखवी तुझेच राणी ....
कधी होई चित्रकार तो,
कधी मनास कुंचला मानी ....

खिडकीतला हा अवखळ वारा,
चाहूल तुझीच देतो राणी ....
कधी गंध तुझ्या तनुचा,
कधी तुलाच मिठीत आणी ....

पावसाची रिमझिम ओली,
चिंब करी तुला राणी ....
कधी ओला मी तुझ्यासवे,
कधी ओल्या जाणीवा मनी ....

चांदण्यांची रात्र सजली,
आठवणीत तुझ्याच राणी ....
कधी फुलते हसू ओठी,
कधी डोळ्यांत जमते पाणी ....

तूच तू एक तुझेच सारे,
तुझाच मी पण झालो राणी ....
कधी गुंतलो कसा कुठे,
कधी हरवलो न ठावे सजणी ....
कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी
चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळे मीलनाची उर्मी

लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते
प्रियतम भेटाया तुज आले मी .... कळलं का ?

मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया
माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया, माझा राया गं 
मर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया

माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया, माझा राया गं 
माझं काळीज तू, माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी
या संसाराला देवाजीची छाया गं 

मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावूनी गेला

होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला
तू आलीस अन्‌ जगण्याला अर्थ नवा आला
प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावूनी गेला

मक्याच्या शेतात एकलीच होते ठावूक नव्हतं कुणा
अरे उभ्या पिकामंदी आडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा
मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा

तुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्‍नात तू, तरी का रे सख्या दूर तू
सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे

तुझ्या प्रीतित झालो खुळा, छंद नाही मला वेगळा
माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्‍नात तू, तरी का गं सखे दूर तू
सजणी याद ही याद ही छळते तुझी याद गं 
तुझे रूप राणी, कुणासारखे ग ?
तुझे रूप राणी तुझ्यासारखे ग !

तुझा रेशमी केशसंभार काळा
जणू नागिणीचा दिसे धुंद चाळा
बटा दोन भाळावरी की जिभा त्या
तिच्या मस्तिला कोण रोधू शके ?

तुझे दोन डोळे शराबी शराबी
हसे लाज गाली गुलाबी गुलाबी
असे रूपलावण्य मी प्राशितो हे
मला लाभले ते तुला पारखे !

उभी अप्सरा चिंब न्हाऊन येथे
नजर फेकिता रिते बाण-भाते
विधाता करी काय हेवा तुझा गे
न्याहळून पाही तुला कौतुके !

Tuesday, September 3, 2013

न्हा आठवन आली आज
त्याच नाजूक क्षणांची
काही वेळ तरी होती सोबत
त्याच्या आपले पाणाची

  खांद्यावरती डोके ठेवून
दुख आपले सांगण्याची
एकमेकांचे हात धरूण
प्रित फुलांना जपण्याची

समुद्राच्या लाटानसारख
उंच उंच उडण्याची
क्षिटिजातील त्या शून्याकडे
एकटक बघण्याची

दोघांनी मिळून बघितलेल्या
सुंदर सुंदर स्वप्नांची
पुन्हा आठवण झाली आज
त्याच नाजूक क्षणाची....... ♥♥♥ missss uuu....
खुप प्रेम करते रे
तुझ्यावर
तुला समजावु तरी कसे
मन मारावे तु माझ्यासाठी
कधीच अशी माझी अपेक्षा नसे
... असा काही ये जिवनात माझ्या
की आपला एकच जीव होईल
स्वर्ग नको फक्त तु ये
स्वर्ग आपोआप तयार होईल
एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,

एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,
तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..
तुझी पाऊलखूण शोधणारं..

एक नजर..
जी सारखी तुलाच शोधते...
प्रत्येकाच्या डोळ्यात..
तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..
पुन्हा पुन्हा..
तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..

एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..

एक कुंचला..
तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..
तू येऊन पुन्हा..
रंग भरशील माझ्या आयुष्यात..
अशी आस लावणारा..

एक जीव..
तडफडणारा..
असहाय्य....
तुझ्याचसाठी....
" तुझ्याशिवाय "....
तुझ्या डोळ्यातिल आश्रु मला प्यायचेत
तुझ्या डोळ्यातिल आश्रु मला प्यायचेत
तुझ्या ओठांवर मला फ़क्त हसने पहायचय
तुझ्या चेहर्यावर सुख पहायचय मला
मला तुझ्यावर खुप प्रेम करायचय
असच एकदा तुझ्या स्वप्नात यायचय
अलगद तुझा हात माझ्या हातात घ्यायचाय
तुझे डोके माझ्या कुशीत घेउन बसायचय
मला तुझ्यावर खुप प्रेम करायचय
तू समोर नसतानाही तुला अनुभावयचय
तेव्हाही तुला खुप आनंदी पहायचय
माला फक्त तुझ्यासाठी जगुन पहायचय
खरा तर तुझ्यावर खुप प्रेम करायचय
तुझ्या समोर येउन मला सर्वस्व हरवून बघायचय
आणि पुन्हा पुन्हा मला तुझ्या डोळ्यात
शोधयाचय...ते फक्त प्रेम.....
आज मला खूप एकट वाटतय,
कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय,
कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय,
अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय....
... आज परत एकदा तिला पहावस वाटतय,
त्या प्रेमाच्या आठवणीना, परत जगवावस
वाटतय,
तिचा हात परत माझ्या हातात
घेऊन,थोडा चालावस वाटतय,
अन परत एकदा तिला लाजताना बघावस
वाटतय...
आज मला खूप खूप रडावस वाटतय,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय,
भरलेल्या डोळ्याने, आरश्या समोरबसावास
वाटतय,
अन आपलं कोणीच नाही,
म्हणून,
आरश्या समोर बसून,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...
आज मला परत भूतकाळात जावस वाटतय....
परत एकदा,
तिच्याच आठवणींत जगावस वाटतय....
फक्त तिच्याच आठवणींत जगावस वाटतय...

मी रागावलो की,
तु ही रागावतेस..
मी Sorry म्हणालो,
की तुही Sorry म्हणतेस..
माझे तुझ्यावर प्रेम आहे,
म्हणण्या अगोदर तूचं म्हणतेस..
प्रेम काय असते ते,
समजावूनही सांगतेस..
अशी कशी गं तू,
कधी रडवतेस, तर कधी हसवतेस..
कधी खूप Rough, कधी खूप नाजूक,
तू नसतेस, पण तरीही असतेस..
कधी मला फसवतेस,
तर कधी स्वःता
तुझ्यासाठीचं फसले असे हसत सांगतेस..
आता तुझ्याशिवाय जगणे नाही, असे
म्हणताचं,
असे नसून एकमेकांशिवाय जगणे नाही असे
म्हणतेस..




आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ
शकला नाहीत तर
.,दुरावा वाढतो अंतर वाढते
.यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण
नसते
.चूक वेळेची असते
.यावर एकाच उपाय आहे
,त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे
द्या कि
.तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण
त्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर
क्षणावर भारी पडतील
.,जीवाला जीव देणारी माणसं खूप
कमी असतात त्यांना असे गमवू नका
".आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते.
I Miss YOU.........
वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचीत
कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती !
शब्दांचा आधार घेऊन जर दुखः व्यक्त करता आले असते तर कदाचीत
कधी "अश्रूंची" गरज भासलीच नसती !
"आणि"
सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किँमत
कधी उरलीच नसती !

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो ...,
तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात..,

पण .......,

ती व्यक्ती नसते....
जी आपल्याला त्या क्षणी..
आपल्या बरोबर हवी असते .....
आपल्या खूप जवळ हवी असते....






माझ्या सावलीलाही सवय
तुझ्या आठवणींची, आठवणी त्याच
तुझ्या मनातल्या साठवणींची,
क्षितिजाच्या समांतर तू हि आहेस
अशी आशा बाळगण्याची,
एकटेपण स्वतःच स्वताशीवाटून घेण्याची,
आणि सवय झाली आहे मला आता,
तुझ्या आठवणीत जगण्याची...
सवय झाली आहे मला आता,
तुझ्या आठवणीत जगण्याची...


Monday, September 2, 2013


प्रश्नचिन्ह!
स्वप्नी माझ्या
रोज येतेस तू
घेऊन एक
प्रश्नचिन्ह?
नको नको म्हणताना
तोच हट्ट करतेस तू!
मनातल्या व्यथा
मनातच दडवत;
प्रश्नांचा गुंता करतेस तू!
शब्द तुझे गोठले असताना;
आसवांचाच पाऊस
पाडतेस तू!
ओसंडून जाऊ दे
बांध मुक्या भावनांचा
कदाचित तो प्रवाह
शोधील एक चोरवाट;
जी घेईल ध्यास
तुझ्या अंतरीच्या
अव्यक्त वेदनांचा!
तेव्हा नसतील कुठलेच प्रश्नचिन्ह!
असेल फक्त एक जिव्हाळा
जसा रानावनातला गारवा!
कदाचित
असेल ती एक निखळ मैत्री
दिव्यातल्या धगधगत्या ज्योतीसारखी!
किंवा
असेल ते एक अतूट बंधन
प्रीतीच्या धाग्यांनी घट्ट गुंफलेलं!
कधीही न तुटणार!
कधीही न सुटणार!
पण नसतील कुठलेच प्रश्नचिन्ह!
असेल फक्त एक प्रवास;
सहज, सोपा
शून्याकडून जीवनाकडे वळणारा!
कदाचित
असेल तो एक सहप्रवास;
चार पावलांचा, चार कप्यापलीकडला!
तुझ्या - माझ्या मनाचा
शिखर अन क्षितीज गाठणारा!
स्वप्नी माझ्या
आता तू येऊ नकोस!
प्रश्नांचा गुंता वाढवू नकोस!
तुझ्याशिवाय मी जगावे
कि माझ्याशिवाय तू जगावे;
मला न उमगलेलं
ते एक सत्य असावं!
अर्धसत्य!
कि
पुन्हा एक प्रश्नचिन्ह?




कान्हा आज मल्हाराची छेडु नको तान रे
वेडावली राधा, मन झाले बेभान रे
श्रावण सरीवर, शहारते बासरी
सुरातुन राधे तुला, भुलवतो श्रीहरी
ओल्याचींब तनावरमोहरले प्रेम सुर
मेघावर सातसूर ईंद्रधनू छान रे
वेडावली राधा, मन झाले बेभान रे
काजळल्या रुतुमधे, कान्हा तुझा भास रे
जागवली बासरीने, मिलनाची आस रे
नभातुन गीत पुन्हा
राधा कान्हा राधा कान्हा
राधा देह बासरीचा, सुर-तुझा, प्राण रे..
वेडावली राधा, मन झाले बेभान रे
तुझ्या माझ्या नात्याला अजून काय हव
गोड तुझी आठवण तू माझ्या हृदयात ठेवीत जा ग
खूप आणि खूप छान आहेस तू खरच
अजून मला काही नको फक्त तुझ्या मनात ठेवत जा ग
मासूम माझी नजर काहीवेळ बोलू शकत नाही
कधी तरी खरच नजरेची भाषा समजत जा ग
अनोळखी आहोत आपण दोन आपल्या मनांचे
कधी उमगली माझी कमी तर माझी आठवण काढत जा ग
कसा ओढला गेलो मी
कसा गुंतत गेलो
ठरवूनही स्वतःला
सावरू नाही शकलो
असं काय होत तुझ्यात
तेच तर कळत नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही …
कधी तुझं भेटणं
मला आवडू लागलं
कधी तुझ्यासाठी
मन झुरू लागलं
कधी फसलो जाळ्यात
काही समजत नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही …
तू भेटत गेलीस
मन वेड होत गेलं
कळलं नाही काळजात
कधी घर केलं
तुझा कसा होत गेलो
काही आठवत नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही …
तुझा गंध श्वासास
कसा गुंतवत गेला
तुझ्या प्रेमात कधी
मला पाडून गेला
हे भाव कधी उमलले
हृदयासही कळले नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही .

असे कसे हे क्षण तरसे सांग ना
गूढ ते सांग ना रे सांग ना
चिंब भिजला धुंद जाहला
मोहोर पुन्हा कसा बहरला
तव नजरे खेरीज काही दिसे ना
असे कसे हे क्षण तरसे सांग ना
गूढ ते सांग ना रे सांग ना...
दव पसरला खेद हरपला
हुरूप असा नव्याने गवसला
तव स्पर्श खेरीज काही कळे ना
असे कसे हे क्षण तरसे सांग ना
गूढ ते सांग ना रे सांग ना...


मनात प्रेम उमलू लागल्यावर
ओढ सुरु होते
रात्री निजल्यावर
स्वप्न सुरु होते
कुठ्लाची क्षण असो
झुरणे सुरु होते
जवळ असो वा दूर
मन बेचैन होते
नकळत आठवणीत
राहणे सुरु होते
आठवणीच्या झुल्यावर
पाहणे सुरु होते
पापण्या मिटल्या तरी
दिसणे सुरु होते
एकांतातही प्रेमासोबत
बोलणे सुरु होते
सुख दु:खाचा लपंडाव
खेळणे सुरु होते
स्वतःला विसरून प्रेमासाठी
जगणे सुरु होते
मनात प्रेम उमलू लागल्यावर
मन वेडे होते
प्रेमाभोवतीच प्रत्येक क्षण
मन फिरू लागते .
प्रेमाने कधी पाहिलंस तर मन
भरून येत,
पाहता पाहता मन तुझ्या आठवनितच
विरून जातं,
कळत नकळत मनातल्या भावनांना काहीतरी तेव्हा
स्पर्शून जातं,
पण तू बोलण्याआधीच तुझ्या मनातलं उमजून
ओठावर येतं
खरं तर तुझ्या प्रेमाने माझ्या डोळ्यांवर पांघरून
अंथरल होतं
आणि नसतानाही मनात सारखं तुझच
नाव येत होतं ।।।।
ए ऐक ना...
मला तुला काही सांगायच आहे,
मनात दळलेल्‍या प्रश्‍नांचे वादळ
ओठावर आनायच आहे.
सांगीतल्‍यावर कदाचित हसशील तु,
कदाचित...
कदाचित माझ्यावर रागवशिलही तु.
सांग रे आता लवकर...
नको ना बोर करु.
ए सांग ना...अस का ग होत.
तुला बघीतल्‍यावर मन अस
उंच उंच का ग उडत,
तुने बघीतल्‍यावर काळीज
का ग अस धडधडत.
तुझ्याशी बोलतांना
का ग जगाचा विसर पडतो,
आणि जेव्‍हा खळखळुन हसतेस
तेव्‍हातर चक्‍क हृदयाचा ठोकाच चुकतो.
ए सांग ना...का ग अस होत.
तुझ्या प्रश्‍नानवर मला खुप हसायला येत आहे.
बहूतेक आता तुला वेड्यांच्‍या दवाखान्‍यात
भरती करावे लागेल असे मला वाटत आहे.
वेडा आहेस तु वे...डा...
बर मी वेडा
लोक म्‍हणतात कि
वेड्यान बरोबर राहण अशक्‍य असते.
पण मला अस का ग वाटते
कि तु हे करु शकते.
मला तुझ्या हृदयात
जागा देशील का,
ए सांग ना...
या वेड्या
ला सांभाळशील का.
एखादी ओळ,
चंद्राची कोर होते,
एखादी ओळ,
नाचणारा मोर होते,
नाचणारा मोर होते,
एखादी ओळ,
चढणीचा घाट असते,
एखादी ओळ,
ठुमकणारी वाट असते
ठुमकणारी वाट असते
एखादी ओळ,
स्वतःशीच लाजुन हासते,
एखादी ओळ,
हळुच आपले डोळे पुसते
हळुच आपले डोळे पुसते
एखादी ओळ,
केशरी जंतरमंतर असते,
एखादी ओळ,
दोघातलं अंतर असते,
दोघातलं अंतर असते,
एखादी ओळ,
फ़ुलपाखरा मागे धावते,
एखादी ओळ,
अंधारत दिवा लावते,
अंधारत दिवा लावते,
एखादी ओळ,
सरींमधे चिंब भिजते,
एखादी ओळ,
आपलेच प्रतिबिंब बनते.
तुला पाहिलं की
अस काय होवून जात
माझ मन मला
कस विसरून जात
तुझ्या डोळ्यात पाहून
भान हरवून जात
तुला घेवून मन
नभात उडून जात
तुझ्या केसात हरपून
मन गुंतून जात
त्या रेशीम जाळ्यात
मन गुंफून जात
तुझ्या गोड हसण्यान
मन फसून जात
गालावरच्या खळीवर
मन खिळून जात
तुला पाहिलं की
मन वेड होत
कळत नाही कस
मनात प्रेम उमलून जात
आज माझे शब्द माझ्याशिच बोलले,
हृदयातिल गुपित त्याने हळुच खोलल.
आवडतेना तुला ती खुप;
मग असा का बावरतोस.
तुझ्या ह्या वेड्या मनाला;
क्षणाक्षणाला का आवरतोस...
तुझ्या प्रेमाचा नाचुदे मोर..,
हळुच तिच्या हृदयाला तिच्यापासुन चोर...
उडवुन मनाच वादळ थांब तिला...,
करतोस तु जिवापाड प्रेम सांग तिला...

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो चंद्र आठवतो .
उगाच चांदण्यांच्या गराड्यात एकटा भासतो ,
एकटा असूनही प्रकाश मात्र देतच राहतो .
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो समुद्र आठवतो ,
खारट असूनही किती जीव सांभाळतो ,
लोक म्हणतात भरती आली ,
पण का कुणास ठाऊक मला मात्र तो किनाऱ्याला भेटल्याचा भास होतो .
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो अथांग वाटेवरचा वाटसरू दिसतो ,
लोक म्हणतात तो दूर जातोय ,
पण मला मात्र तो इच्छित ध्येयाच्या जवळ भासतो.
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
भूतकाळात कुठेतरी मी हरवून जातो ,
तू म्हणतेस मी मुमताज नाही तुझी ,
पण का कुणास ठाऊक,
मी मात्र शहाजानच असल्याचा भास होतो ….
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ………




“आवडते” मला
“आवडते” मला तुझ्या ओठांसोबत खेळायला ,
“आवडते” मला तुझा सहवास बनायला ,
“आवडते” मलातुझ्या त्या कोमल ओठांवरचे शब्द बनायला ,
“आवडते” मला त्या नकळत पणे हलणाऱ्या पापण्यांचे स्पंदन बनायला
“आवडते” मला तुझ्या कोमल गालांवरची खळी बनायला ,
“आवडते” मला तुझ्या कानात गुंजणार तो मधुर आवाज बनायला
“आवडते” मला तुझाहात माझ्या हातात घ्यायला ,
“आवडते” मला तुझ्या त्या नाजूक हातांचा स्पर्श बनायला
“आवडते” मला तुला मिठीत घ्यायला ,
“आवडते” मला माझा सहवास तुला द्यायला
“आवडते” मला तुझी पैंजण बनायला ,
त्यातून गुंजणार तो आवाज बनायला
“आवडते” मला तू
आणि
तुझी सावली बनून राहायला ...."