NiKi

NiKi

Thursday, September 19, 2013

तान्ह्या बाळासारखं...निरागस हसणं तुझं...
नकळत मनात....अलगद बसणं तुझं....
केसांची एक लट...हळूच कानामागे घेणं तुझं...
नसताना लक्ष माझं...हळूच लक्ष देणं तुझं....

नजरेशी माझ्या...नजरेनीच बोलणं तुझं....
ऊनाड वाऱ्यासंगे...वारा होऊन डोलणं तुझं....
गालावर नाही खळी...तरी नक्षत्र रूप तुझं....
मनातली परी तू....दुर्मिळ हे सगळं...जप तुझं...

ना तू फुलाइतकी सुंदर...
पण त्याहून सोज्वळ असणं तुझं....
श्वासाहून झालीस गरजेची तू....
क्षणोक्षणी जाणवतं...नसणं तुझं...

No comments:

Post a Comment