NiKi

NiKi

Monday, September 2, 2013

कसा ओढला गेलो मी
कसा गुंतत गेलो
ठरवूनही स्वतःला
सावरू नाही शकलो
असं काय होत तुझ्यात
तेच तर कळत नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही …
कधी तुझं भेटणं
मला आवडू लागलं
कधी तुझ्यासाठी
मन झुरू लागलं
कधी फसलो जाळ्यात
काही समजत नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही …
तू भेटत गेलीस
मन वेड होत गेलं
कळलं नाही काळजात
कधी घर केलं
तुझा कसा होत गेलो
काही आठवत नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही …
तुझा गंध श्वासास
कसा गुंतवत गेला
तुझ्या प्रेमात कधी
मला पाडून गेला
हे भाव कधी उमलले
हृदयासही कळले नाही
कसा पडलो प्रेमात
अजूनही कळत नाही .

No comments:

Post a Comment