NiKi

NiKi

Friday, September 13, 2013

स्पर्श होता तुझ्या गंधाचा
मनी मोर नाचतो
रोम रोम बहरून
श्वासात तुला भेटतो
तू अशीच वहाते माझ्यात
माझ्याही नकळत
दूर असूनही तुझा
स्पर्श मी अनुभवतो
तुझे असे असणे
हृदयी फुलवी चांदणे
मोगरा माझ्या प्रेमाचा
मनी फुललेला असतो
हि प्रीत वेडी प्रिये
तुझ्यासाठीच जगतो
मजलाही ठाव नाही
मी माझा किती उरतो .
-------------------------

No comments:

Post a Comment