NiKi

NiKi

Monday, September 2, 2013

मनात प्रेम उमलू लागल्यावर
ओढ सुरु होते
रात्री निजल्यावर
स्वप्न सुरु होते
कुठ्लाची क्षण असो
झुरणे सुरु होते
जवळ असो वा दूर
मन बेचैन होते
नकळत आठवणीत
राहणे सुरु होते
आठवणीच्या झुल्यावर
पाहणे सुरु होते
पापण्या मिटल्या तरी
दिसणे सुरु होते
एकांतातही प्रेमासोबत
बोलणे सुरु होते
सुख दु:खाचा लपंडाव
खेळणे सुरु होते
स्वतःला विसरून प्रेमासाठी
जगणे सुरु होते
मनात प्रेम उमलू लागल्यावर
मन वेडे होते
प्रेमाभोवतीच प्रत्येक क्षण
मन फिरू लागते .

No comments:

Post a Comment