NiKi

NiKi

Wednesday, September 25, 2013

तुझ्या रूपापुढे काय तो चंद्र काय ते तारे...
कस्पटा समान दिलखेच नज़ारे सारे...

तुलना तुझी कधी ना होणार कुणाशी....
तृण समान ती रम्भा आणि ती उर्वशी...?

नयनी तुझ्या खोली सागराची...
घडविते सफ़र मज ह्या विश्वाची..

तुझ्या केसांपुढे वर्षामेघ ही फिका..
केसांच्या छायेत आल्हाद गोजरा ...

तुझ्या चाली पुढे वरमतो मयूर...
घायल हजारो परि तुझा ना कसूर...

स्वर तुझा जणू काही आठवा सुर...
वाणी तुझी मधुरा पेक्षा ही मधुर..

स्पर्श तुझा मातेच्या चरण परि...
नसेल तसा आनंद ह्या धरे वरी...

जगी स्वप्नांच्या हरविले हे मन...
तुला पाहण्याकरीता तरसले हे नयन...

धुंद राती येते तुझी आठवण खुप...
आठवते मज तुझ्या प्रेमाची उब...

ये प्रिये नको अंत पाहुस ह्या जिवाचा...
प्रतिसाद हवाय मज तुझ्या प्रेमाचा...

No comments:

Post a Comment