जगातलं एकही माणूस आपल्याला आजवर आवडलं नाही असं म्हणताच येत नाही.
नुकत्याच जन्माला आलेल्या तान्ह्या बाळाचंही कोण ना कोण तरी आवडतं माणूस असतं, ज्याला पाहून ते आपसूकच हसतं.
कुणीतरी मनात आवडतं असतंच. खोटं का बोलावं? पण आवडीला मनात दडवून ठेवलं जातं.
कधी स्वाभिमानाच्या नावाखाली जपलेला इगो तर कधी स्वत:वरचा अविश्वास मध्ये येतो.
त्या व्यक्तीच्या खूप जवळ रहावंसं वाटत असतं. सगळं सांगावंसं वाटत असतं.
पण का? माहित नाही.
प्रत्येक 'का?' चं कारण सहज मिळवून दिलं, तर ती नियती कसली?
आपली आवडणारी माणसं कधी कधी नियती आपल्याला मिळवून देते.
पण घास अगदी तोंडापर्यंत भरवायला नियती काही आई नाही ना?
नियती ताट भरते, घास नाही भरवत. स्वत:चे घास स्वत:च भरवून घ्यायचे असतात.
नियतीने मिळवून दिलेल्या माणसांना आपलं करण्यासाठी कधीकधी राजकारण खेळावं लागतं.
मनालाही कधीकधी बुद्धीची गरज भासते आणि तेव्हा ती नक्की घ्यावी.
आपल्याच माणसांना मुद्दाम टाळावं लागतं, कारण...
कधीकधी अंतर कमी करण्यासाठी अंतर ठेवणं गरजेचं असतं.

No comments:
Post a Comment