असे कसे हे क्षण तरसे सांग ना
गूढ ते सांग ना रे सांग ना
चिंब भिजला धुंद जाहला
मोहोर पुन्हा कसा बहरला
तव नजरे खेरीज काही दिसे ना
असे कसे हे क्षण तरसे सांग ना
गूढ ते सांग ना रे सांग ना...
दव पसरला खेद हरपला
हुरूप असा नव्याने गवसला
तव स्पर्श खेरीज काही कळे ना
असे कसे हे क्षण तरसे सांग ना
गूढ ते सांग ना रे सांग ना...
No comments:
Post a Comment