NiKi

NiKi

Thursday, September 19, 2013

या आभाळाने, या लाटांनी आमची प्रत्येक स्वप्नं ऐकली आहेत.
तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं की, मनाला जे समाधान मिळतं ते फक्त मला अन या आभाळाला जाणवतं.
तू ही परकाच या रे जाणीवेपासून.
माझ्या बंद डोळ्यांमागे मी जे काही पाहिलं, तेव्हा तिथेही हे आभाळ होतंच.

तू सोबत असताना नक्की काय वाटतं, हे शब्दात सांगू!! इतकी मोठी परीक्षा नको रे शब्दांची.
दूरदूर नजर टाकूनही आभाळ काही नजरेत मावत नाही.
मला तुझ्यासोबत त्या आभाळाच्या टोकापर्यंत जायचंय. पहायचंय कुठं संपतं ते.
ते थकेलच ना कुठेतरी? पण आपण चालत राहू... दोघे... एकमेकांसोबत

तुला लक्षात राहील ना? हे आपलं भेटणं, हा किनारा आणि... मी.
मी पण लक्षात नाही रे ठेवणार. पण... विसरता नाही येणार.
कारण नको विचारूस कधी.
एखादी गोष्ट लक्षात राहण्याची किंवा मुद्दाम लक्षात ठेवण्याची ज्याची त्याची कारणं वेगवेगळी असतात

No comments:

Post a Comment