NiKi

NiKi

Monday, September 2, 2013

ए ऐक ना...
मला तुला काही सांगायच आहे,
मनात दळलेल्‍या प्रश्‍नांचे वादळ
ओठावर आनायच आहे.
सांगीतल्‍यावर कदाचित हसशील तु,
कदाचित...
कदाचित माझ्यावर रागवशिलही तु.
सांग रे आता लवकर...
नको ना बोर करु.
ए सांग ना...अस का ग होत.
तुला बघीतल्‍यावर मन अस
उंच उंच का ग उडत,
तुने बघीतल्‍यावर काळीज
का ग अस धडधडत.
तुझ्याशी बोलतांना
का ग जगाचा विसर पडतो,
आणि जेव्‍हा खळखळुन हसतेस
तेव्‍हातर चक्‍क हृदयाचा ठोकाच चुकतो.
ए सांग ना...का ग अस होत.
तुझ्या प्रश्‍नानवर मला खुप हसायला येत आहे.
बहूतेक आता तुला वेड्यांच्‍या दवाखान्‍यात
भरती करावे लागेल असे मला वाटत आहे.
वेडा आहेस तु वे...डा...
बर मी वेडा
लोक म्‍हणतात कि
वेड्यान बरोबर राहण अशक्‍य असते.
पण मला अस का ग वाटते
कि तु हे करु शकते.
मला तुझ्या हृदयात
जागा देशील का,
ए सांग ना...
या वेड्या
ला सांभाळशील का.

No comments:

Post a Comment