तुझे डोळे... ते जरा किंचितसे ओले
लपवलेल्या थेंबामागून... ना जाणे किती बोले
तुझे डोळे... नेहमीच एक कोड्यासारखे
कधी खूप सांगणारे... कधी एकदम शांत रहस्याचे
तुझे डोळे... हसता हसता भरून येणारे
दूर कुठेतरी....मला सोबत नेणारे
तुझे डोळे.... कधी त्यात तडजोड दिसते मला
त्यात नेहमीच 'मी' अन् कधीतरीच 'तू' दिसते मला
उद्या कुणी पाहिलाय? ना 'मी' ना 'तू'
पण आठवतील... तेच डोळे... नेहमी मला ओळखणारे
'कुणाला तरी आपण हवं असणं, खूप खूप हवं असणं' हे आपल्याला नेहमीच सुखावतं ना?
हेच मला तुझ्या त्या डोळ्यांत दिसतं....म्हणून ते मला हवे हवेसे वाटतात.
तेच डोळे.....कुठल्या तरी खोल विचारात बुडालेले.
मी ओळखू शकलो का तुला? चुकलो ही असेन कित्येकदा
माफ हि केले असशील कित्येकदा... माझ्या नकळत... मला चूक समजूनही न देता
तुझ्या प्रत्येक कटाक्षाने मला आठवणी दिल्यात... तुझ्या नकळत... तुला समजूनही न देता

No comments:
Post a Comment