NiKi

NiKi

Thursday, September 19, 2013

तू मला... मी तुला....
गुणगुणू लागलो...
पांघरू लागलो...
सावरू लागलो....
नाही कळले कधी....
नाही कळले कधी....

नाही कळले कधी.. जीव वेडावला
ओळखू लागलो.. तू मला मी तुला
नाही कळले कधी....
धुंद हुरहूर हि.. श्वास गंधाळला
ओळखू लागलो.. तू मला मी तुला
नाही कळले कधी....

तू मला... मी तुला....
गुणगुणू लागलो...
पांघरू लागलो...
सावरू लागलो...

तू कळी कोवळी.. साजिरी गोजिरी
चिंब ओल्या सरी.. घेत अंगावरी
स्वप्न भासे खरे.. स्पर्श होता खुला
ओळखू लागलो.. तू मला मी तुला
धुंद हुरहूर हि.. श्वास गंधाळला
ओळखू लागलो.. तू मला मी तुला
नाही कळले कधी....

शब्द झाले मुके.. बोलती पैजणे
बदलले काही या.. सोबती चांदणे
पाहताना तुला.. चंद्र हि लाजला
ओळखू लागलो.. तू मला मी तुला
नाही कळले कधी.. जीव वेडावला
ओळखू लागलो.. तू मला मी तुला
नाही कळले कधी....

तू मला... मी तुला....
गुणगुणू लागलो...
पांघरू लागलो...
सावरू लागलो....

तू मला... मी तुला....
गुणगुणू लागलो...
पांघरू लागलो...
सावरू लागलो....

नाही कळले कधी....

No comments:

Post a Comment