NiKi

NiKi

Friday, September 13, 2013

तुझ्या डोळ्यातलं टिपूर चांदण
माझ्या मनास वेड लावत
तुझं ते चोरून बघणं
माझं ऊर खाली वर करतं
तुझं ते लाजून हसणं
माझ्या काळजात घर करतं
तुझी ती नजर झुकवणं
माझ्या मनास खूप आवडतं
तुझं ते अबोल राहणं
माझ्या मनात प्रीत फुलवतं
तुझ्या नजरेन मला खुणावण
तुझा गुलाम करून टाकत
तुझ्या मनातही आहे प्रीत
माझ्या मनास कळून जातं
जेव्हा तुझ्या नजरेतल प्रेम
माझ्या नजरेला कळून जातं

No comments:

Post a Comment