NiKi

NiKi

Wednesday, September 4, 2013

माझ्या स्वप्ना मधे सूद्धा
एक सूंदर परी असते
ति स्वप्न रंगवून माझे
मला स्वप्ना मधे छऴीत असते

.
.
तिच्या तिरकस भूवयांच्या मधे
तिने एक गंध लावलेले असते
तिला शोभून दिसनारे ते गंध
जणू तिच्या साठीच बनलेले असते
.
.

कोमल काना वरून तिच्या
रांगेत केसांची गर्दी जात असते
अन् झूऴूक आली हवेची एक, की
ती चेहरयावरच येवून बसत असते
.
.

गोड गालावर पडणारी खऴी
हि तिला खूपच शोभून दिसते
जणू संथ पाण्या मधे
ति एक भोवरा बणून खूदू खूदू हसते

.
.
तिच्या निरागस चेहरयावर
तिची बारीक नथ ईतकी शोभून दिसते
जणू चंचल चंद्राच्या सोबतीला
ति चांदणीच शोभून दिसते

.
.
तिच्या शूभ्र ओठांवर
गूलाबी लाली शोभून दिसते
जणू गूलाबी कोमल फूलाला
त्या पांढरी पाकऴी शोभून दिसते

.
.
चंचल चालण्या मधे तिच्या
एक वेगऴीच अदा असते
जणू चालणारया पायांनी
ती जमीन च निर्मळ होत असते

.
.
मोरपंखी साडी नेसून माझी परी
ईतकी अप्रतिम ती दिसत असते
कि हि
माझ्या स्वप्ना मधील परी
हि फक्त माझ्या साठीच बनलेली असते

No comments:

Post a Comment