चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितीजावर लुकलुकणारा एक तर मात्र आठवणीने दे
बेभान कोसळणारा मुक्त पाऊस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे
बेदुंध करणाऱ्या रातराणीचा बहार नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवणीने दे
मुठी एवढे हृदय नाही मागत तुझ्याकडे
माझ्यासाठी चुकलेला ठोका मात्र आठवणीने दे
नाही जास्त कसली अपेक्षा तुझ्याकडून
तुझ्या जीवनात मला महत्वाचे स्थान जरूर दे
नाहीच जमले काही तरी हताश होऊ नकोस
माझ्या पार्थिवाला दावाग्नी आठवणीने दे
आठवणीने दे.........
No comments:
Post a Comment